आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गप्रेमी साशंक:पुणे-मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणासाठी जवळपास 266 झाडांची कत्तल, पुर्नरोपणाचा अधिकाऱ्यांचा दावा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जूना पुणे- मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणासाठी शहरातील 266 हून अधिक झाडे तोडण्यात आली आहेत. यात पूर्णपणे वाढलेली वृक्षांचाही समावेश आहे वृक्षांचाही समावेश नुकसान भरून काढण्यासाठी ते जुन्या झाडांचे पुनर्रोपण करून रोपे लावतील, असा दावा अधिकारी करत आहेत, मात्र नागरिक आणि निसर्गप्रेमी याबाबत साशंक आहेत.

खडकी रेल्वे स्टेशन ते महाराष्ट्र स्टेट सेंट्रल हॅचरी चौकापर्यंतच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या 2.2 किमी भागामुळे अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या वारंवार होते. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे जवळपास 266 झाडे तोडण्यात आली आहेत.

स्थानिक साशंक

स्थानिक रहिवासी पुर्नरोपण प्रक्रियेबद्दल आणि दावा करण्यात आलेली 100 झाडे यशस्वीरीत्या पुनर्रोपण केली जातील की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. हे क्षेत्र खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत येते, परंतु पुणे महानगरपालिका आणि संरक्षण इस्टेट ऑफिसर संयुक्तपणे कामावर लक्ष ठेवत आहेत.

पुर्नरोपण करू

नवीन वृक्षारोपण सरकारी नियमांचे पालन करावे, अशी मागणी नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केली असून, संरक्षण जमिनीवर योग्य पद्धतीने पुर्नलागवड केली जाईल, असे डीईओने सांगितले आहे.पीएमसीचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे यांनी सांगितले की, संरक्षण जमिनीवर सुमारे 100 झाडे पुर्नरोपण केले जातील.

पुणे महानगरपालिकेने ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाइनचे काम आधीच सुरू केले आहे. आणि दोन्ही बाजूला बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम लेनसह 42 मीटर रुंद सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी 85 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याव्यतिरिक्त, संरक्षण भूमीवर 1,300 झाडे लावण्याची पीएमसीची योजना आहे.

केसीबीचे सीईओ रॉबिन बलेजा यांनी सांगितले की हा भाग डिफेन्स इस्टेटच्या अधिकारक्षेत्रात येतो. केसीबी त्याचे व्यवस्थापन करत नाही. डीईओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की स्थानिक लष्करी प्राधिकरण वृक्ष लागवडीसाठी संरक्षण भूखंडाचा निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.