आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:30 ते 40 वर्षे सत्ता उपभोगून काय केले? तर 'शिवसेनेने करुन दाखवले, मुंबईची तुंबई केली'; प्रविण दरेकरांनी शिवसेनेवर साधला निशाणा

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेने मुंबईची तुंबई केली आहे. मुंबईत शिवसेनेकडून वरुन वरुन कामे केली जात आहे.

राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान मंगळवारी संध्याकाळी मुंबईत तुफान पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई आणि उपनगरांमधील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यावरुन आता विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी '30 ते 40 वर्षे सत्ता उपभोगून काय केले? तर 'शिवसेनेने करुन दाखवले; मुंबईची तुंबई केली असा टोला सेनेला लगावला आहे.

प्रविण दरेकर याविषयी बोलताना म्हणाले की, 'शिवसेनेने मुंबईची तुंबई केली आहे. मुंबईत शिवसेनेकडून वरुन वरुन कामे केली जात आहे. तसेच मुळ मुद्द्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. तसेच पावसाळा गेल्यानंतर काम करण्यासाठी 7 ते 8 महिने राहतात, तरीदेखील येथील कोणतीही कामे केली जात नाहीत. गेल्या 30 ते 40 वर्ष शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले? असा सवालही दरेकरांनी विचारला आहे.

तसेच दरेकर पुढे म्हणाले की, शिवसेनेने आम्ही करुन दाखवले अशा आशयाचे मोठमोठे होर्डिंग्स शिवसेनेनी लावले होते. या होर्डिंग्जप्रमाणे त्यांनी आता खरंच करुन दाखवले आहे आणि मुंबईची तुंबई झाली. आता याची जबाबदारी सेनेनेच घ्यायला हवी असेही ते म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...