आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मनपाच्या ट्रकची दुचाकीला धडक; दोघे ठार:गाडीचालक अपघातानंतर पसार झालेला ट्रकचालक अटकेत

पुणे5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील वानवडी परिसरात टर्फ क्लब चाैकात पाच ऑगस्ट राेजी महानगर पालिकेच्या कचरा ट्रक (एमएच 46 अे.आर 5753) याने एका दुचाकीस भरधाव वेगात धडक दिल्याची घटना घडली हाेती. या घटनेत दुचाकीवरील दाेन इसमांचा दुर्देवीरित्या मृत्यु झाला हाेता. याप्रकरणी पाेलिसांनी ट्रकचालक इसरार अहमद माेहमद इलियास शेख (वय-40,रा.शिवाजीनगर,पुणे) या आराेपी विराेधात गुन्हा दाखल करुन त्यास अटक केल्याची माहिती शनिवारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी दिली आहे.

या अपघातात हनुमंत दगडू काळे (वय-43) आणि दत्ता पाेपट काळे (वय,40, दाेघे रा.अहमदनगर) यांचा मृत्यू झाला हाेता. याबाबत पाेलिस हवालदार राजाराम नारायण कलजी यांनी वानवडी पाेलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. महानगरपालिकेचा कचरा ट्रक घेऊन ट्रकचालक इसरार शेख हा भरधाव वेगात जात असताना, त्याने ट्रक स्वत: हयगयीने व धाेकादायकरित्या चालवून उजव्या बाजूने चालणारा माेटारसायकल चालक हनुमंत काळे व दत्ता काळे यांच्या वाहनास (एमएच 16, बीपी 4195) यास उजवीकडून धडक देवून गाडीसहीत रस्ता दुभाजक यास घासून काही अंतरावर फरपटत नेवून दाेघांना गंभीर दुखापत करुन त्यांचे मृत्यूस कारणीभूत झाला आहे.

दाेघांनी डाेळे गमावले

दुसऱ्या अपघातात हडपसर परिसरातील वैदुवाडी येथील वाहतूक चाैका जवळील सिग्नल जवळ तक्रारदार गणेश लक्ष्मण राक्षे (वय-39,रा.भिगवण, ता.इंदापूर,पुणे) यांचा चुलत भाऊ सचिन संजय राक्षे व त्याचा मित्र किशाेर दिपक फलके (रा.भिगवण,पुणे) हे चारचाकी कार मधून जात हाेते. त्यावेळी आराेपी सलमान शाह (वय-26) याने त्याच्या ताब्यातील आयचर गाडी (एमएच 12 एलटी 5350) हीने राक्षे यांच्या गाडीस जाेरदार, बेरकरापणे व हयगयीने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन पाठीमागून धडक दिली. त्यात त्यांचे गाडीचा पूर्ण चक्काचूर हाेऊन गाडीतील कुलंटचे गरम पाणी त्यांचे अंगावर, डाेळयात उडले त्यात दाेघांचे चेहारा पुर्णपणे भाजून त्यांचे डाेळयांना अस्पष्ट दिसत आहे. तसेच दाेघांच्या हाताला, पायाला लागून गंभीर जखम झाली असून दाेषी गाडीचालक अपघातानंतर सदर ठिकाणी न थांबता पसार झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...