आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्राईम:पीएचडी करण्यासाठी पुण्यात आलेल्या जालन्याच्या तरुणाचा गळा चिरून खून

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा दगडाने ठेचला

पाषाण येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे डॉक्टरेट करणाऱ्या जालन्याच्या तरुणाचा धारदार हत्याराने गळ्यावर वार करून खून करण्यात आला. दरम्यान, पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणाचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला.

सुदर्शन ऊर्फ बाल्या बाबूराव पंडित (३०, मूळ रा. मु. जानेफळ (पंडित) ता. जाफराबाद, जि. जालना) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ संदीप पंडित यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी संदीप पंडित हे सुतारवाडी परिसरात राहतात, तर मृत सुदर्शन हा पाषाणच्या एनसीएल येथे रसायनशास्त्रात पीएचडी करण्यासाठी दीड वर्षापूर्वी पुण्यात आला होता. शनिवारी सकाळी सुदर्शन याचा मृतदेह आढळून आला. या वेळी त्याचा चेहरा हा दगडाने ठेचण्यात आला. आधार कार्डाच्या आधारे पोलिसांनी त्याची ओळख पटवली. दरम्यान, त्याचा खून कोणी व का केला याचा तपास पोलिस करत आहेत. मृताच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...