आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघर आणि गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्याला व्यावसायिकाने हटकले. त्यामुळे टोळक्याने कोयत्याने वार करून व्यावसायिकाचा खून केला होता. तसेच नागरिकांमधील गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी यासाठी गुन्ह्यात अटक करण्यात सात जणांची मुंढवा पोलिसांनी मुंढवा-केशवनगर परिसरातून धिंड काढली.
नागरिकांमधील गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी यासाठी गुन्हेगारांची धिंड काढण्याची मागणी नागरिकांनी बैठका घेऊन मुंढवा पोलिसांकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही कृती पोलिसांनी केली. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले.
मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांच्यासह त्यांच्या पोलिस ठाण्याची पथके केशवनगर आणि मुंढवा भागात सकाळ, दुपार, संध्याकाळ पेट्रोलिंगद्वारे, नाकाबंदी करून ट्रीपलसिट प्रवास करणारे, तसेच संशयास्पद वाटणार्यांची चौकशी करीत आहेत.
रात्रीच्या वेळी हद्दीतील ब्लॅकस्पॉटचीदेखील पेट्रोलिंग करून तपासणी केली जात असताना गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी व त्यांची लोकांमधील दहशत कमी होण्यासाठी त्याची परिसरातून पायी धिंड काढल्याचे पहायला मिळाले. गुन्हेगारांना अशाच पध्दतीने शासन झाले पाहिजे असेही नागरिकांनी यावेळी बोलून दाखविले. घटनेनंतर परिसरातील तब्बल शंभरहून अधिक सराईतांची झाडाझडती घेतली. मुंढवा पोलिस ठाण्याच्या जेवढे आरोपी आहेत त्या सराईत गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडून सामाजिक शांतता भंग होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्याबरोबरच रायझिंग स्टार गुन्हेगारांना दिवसातून दोन वेळा तपासले जात आहे.
मुंढवा परिसरात गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांचा वचक नसल्याची टीका ग्रामस्थांनी केलेली होती. त्यानंतर पोलिसांनी कोणाच्या पुण्यातील आरोपींना अटक करून त्यांची दिंड काढल्याने दहशतीचे वातावरण कमी होण्यास मदत होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.