आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रागातून एका तरुणाचा खून:उधारीचे पैसे मागितल्याने कुऱ्हाडीने वार करत खून, याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्यावर सपासप वार करत खून करण्यात आला. ही घटना फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

युवराज बाबुराव जाधव (३४) असे मृताचे नाव आहे. त्याचे वडील बाबूराव माणिक जाधव यांनी फिर्याद दिली आहे. तर गणेश सुरेश खरात (३५,रा.पापडे वस्ती, फुरसुंगी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे.

फिर्यादीची दुध डेअरी आहे. त्यांचा मुलगा त्यांना व्यवसायात मदत करतो. तर आरोपी गणेश हा मोलमजुरीची कामे करतो. त्याने फिर्यादीचा मुलगा युवराज याच्याकडून २० हजार रुपये हातउसने घेतले होते. युवराज हा गणेशकडे सातत्याने पैसे मागत होता. रविवारी सायंकाळी गणेश हा युवराजच्या घराबाहेर आला होता. तेव्हा युवराजने पुन्हा एकदा गणेशकडे पैशासाठी तगादा लावला. याचा राग आल्याने गणेशने कुऱ्हाडीने युवराजच्या डोक्यावर सपासप वार केले. युवराजच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि तोंडावर गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...