आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनाचा गुन्हा दाखल:मोबाइलसाठी उसने दिलेले 4 हजार न दिल्याने मित्राचा खून

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • , पुण्यातील डेंगळे पुलाजवळ घडली घटना

मोबाइल खरेदीसाठी उसने दिलेले ४ हजार रुपये परत न दिल्याने मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना पुण्यातील डेंगळे पुलाजवळ सोमवारी घडली होती. दरम्यान, आरोपीने मृताच्या घरी जाऊन धिंगाणा घातला. तसेच मृत मित्राने पैसे न देता फसवणूक केल्याची तक्रारही पोलिसांत दिली. बबलू ऊर्फ अब्दुल्ला सरदार (३५, रा. बुधवार पेठ) या संशयिताला बुधवारी पोलिसांनी अटक केली, तर सद्दाम ऊर्फ इस्माईल शेख (२५, रा. बुधवार पेठ) याचा खून झाला आहे. सरदार याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सद्दाम व बबलू हे मित्र असून ते पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. सद्दाम हा बिगारी काम करत होता, तर आरोपी बबलू हा एका पानटपरीवर कामाला आहे. दोन दिवसांपूर्वी सद्दाम याने बबलू याच्याकडून मोबाइल घेण्यासाठी उसने पैसे घेतले होते. मात्र, त्याला सद्दाम हा एका वेश्येसोबत दिसला. यामुळे आपण मोबाइलसाठी दिलेल्या पैशावर तो मौजमजा करत असल्याचा बबलूला राग आला. सोमवारी सायंकाळी बबलूने त्याच्याकडे पैशाची मागणी केली. तेथून दोघेही दारू पिण्यासाठी ढेंगळे पुलाखाली आहे. तेथे त्यांच्यात पैशावरून वाद झाला. त्या वेळी बबलूने सद्दामच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केला.

बातम्या आणखी आहेत...