आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्ववैमनस्यातून घातपात:चाकण परिसरात तरुणाचा गळा चिरून खून, अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - नाशिक महामार्गावर चाकण येथील नाणेकर वाडीत एका तरुणाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या तरुणाचा खून का करण्यात आला, याचे कारण अद्याप समजु शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शशिकांत शिवाजी काशीद (वय - 25)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत हा मंहिद्रा कंपनीत कामाला होता. त्याला रात्री उशीरा नाणेकर वाडीच्या गायरान परिसरात बोलावून अनोखळी व्यक्तीने त्याचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह त्याच्या दुचाकी शेजारी पडून असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले. स्थानिकांनी ही माहिती चाकण पोलिसांना दिली.

पूर्ववैमनस्यातून खून

त्यानंतर चाकण पोलिसांनी घटनास्थळी तातडीने येत घटनेचा पंचनामा केला. मयताचा मृतदेह शवविचछेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकांची निर्मिती केली आहे आणि घटनास्थळ परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत आहे. पूर्ववैमनस्यातून त्याचा खून केला असावा असा प्रर्थामिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.