आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूरतेचा कळस!:घर अन् दागिन्याच्या मोहापायी आजीचा खून; मुलासह नातवाला अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घर आणि दागिन्याच्या मोहापायी नातवाने वडिलांच्या मदतीने आजीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादाक पुण्यात उघडकीस आला. एवढेच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे इलेक्ट्रॉनिक कटरने तुकडे करून नदीपात्रात फेकून दिले. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी मुलासह नातवाला अटक केली आहे.

उषा विठ्ठल गायकवाड, (वय 62) रा म्हसोबा नगर, केशवनगर, मुंढवा असे खून केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संदीप विठठल गायकवाड (वय 42) आणि साहील ऊर्फ गुडडु संदीप गायकवाड (वय 20) यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 5 ऑगस्टला मुंढवा परिसरात घडली आहे.

गळा आवळून खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहील ऊर्फ गुडडु राहत असलेले घर आणि सोन्याचे दागिन्यासाठी आजी उषा त्यांना वेळावेळी घर सोडुन जाण्यास सांगत होती. त्यामुळे चिडुन साहीलने आजी उषा घरात झोपले असताना त्यांचा गळा दाबून 5 ऑगस्टला खून केला. पोलीसांची दिशाभुल करण्यासाठी आरोपीने उषा यांचा मोबाईल गादीखाली लपवून ठेवला. त्यानंतर मंगळवार पेठेतून झाड कापणेचे इलेक्ट्रिक कटर मशीन विकत आणून उषा यांच्या मृतदेहाचे बाथरुममध्ये तुकडे केले. दरम्यान मृतदेह केशवगरमधील फेकला.

असा झाला खूनाचा उलगडा

घरी येवुन कटर मशीन व रक्ताने भरलेले कपडे हे मांजरीतील नदी पात्रात वाहत्या पाण्यात टाकले होते. काही दिवसांनी वाडेगावत एक मानवी उजवा पाय मुळा मुठा नदीचे कडेला मिळाला होता. त्यानुसार पोलिसांनी साक्षीदार व शास्त्रीय पुरावे तपासून बाप लेकाला जेरबंद केले. ही कामगीरी पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी बजरंग देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, उप निरीक्षक धनंजय गाडे, उप निरीक्षक अविनाश मराठे,संतोष जगताप, राजु कदम, वैभव मोरे, दत्ताराम जाधव, महेश पाठक, अमोल चव्हाण, दिनेश भांदुर्गे, सचिन पाटील, योगेश गायकवाड, राहुल मोरे,निलेश पालवे, सारूक, यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...