आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात गुन्हेगारीच्या घटनात वाढ:दोन तरुणांकडून एकाचा खून; केवळ चर्चेच्या आधारे पोलिसांनी केला खूनाचा उलगडा

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परीसरात राहणारे अदित्य उर्फ सोन्या चौव्हाण व राम विजय जाधव हे काळेवाडी चौकात असताना त्यांनी तळेगाव किंवा वडगाव मावळ परीसरात कोठेतरी कोणाचा तरी गेम केला असल्याबाबत चर्चा करत होते. याबाबतची ऐकीव माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर दोघांचा शोध घेत त्यांना जेरबंद केले असून एक खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती पोलीस उपायुक्त(गुन्हे) काकासाहेब डोळे यांनी शनिवारी दिली आहे.

राम विजय जाधव( वय -२२ वर्षे, रा. आकुर्डी, पुणे) आणि आदित्य ऊर्फ सोन्या सुरेंदर चौव्हाण (वय २२ वर्षे, रा. काळेवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर विश्वजीत देशमुख (वय २२ वर्षे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

संबंधित आरोपी बाबत माहिती मिळाल्या नंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी युनिट एककडील कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करून त्यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करून पथकासह स्वतः काळेवाडी, रहाटणी, आकुर्डी या परिसरात जावुन माहिती मिळाल्या प्रमाणे सदर इसमांचा शोध घेत असताना, आकुर्डी येथील जयगणेश व्हीजन, आयनॉक्स थिअटरचे पार्किंगमध्ये राम जाधव व अदित्य उर्फ सोन्या चव्हाण हे दोघे त्याच्या मित्रासोबत दिसले. त्यावेळी त्यांना पकडण्यासाठी पोलिस पथक त्यांच्याकडे जातअसताना ते पळून जावु लागले त्यांचा पोलिस पथकाने पाठलाग करून मोठ्या शीताफीने जेरबंद केले.

ताब्यात घेतलेले आरोपी राम जाधव आणि आदित्य ऊर्फ सोन्या चौव्हाण यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ०७/०६/२०२२ रोजी आरोपी व त्याचे इतर सहा मित्र असे वडगाव मावळ येथे वाढदिवसाच्या पार्टीसाठी जात असताना मातोश्री हॉस्पीटल जवळ, रोडचे कडेला असणारे पानाच्या टपरीवर थांबलेल्या इसमांशी किरकोळ कारणावरुन त्यांची भांडणे झाले होते. टपरी चालक व त्यांचे मित्रांनी त्यांना मारहाण केली होती. त्याचाच राग मनात धरून आरोपी व त्याचे सहा साथीदार यांनी १३/०६/२०२२ रोजी भांडणाचे तयारीत पुन्हा पानाच्या दुकानाजवळ जावुन त्यांना मारहाण करणाऱ्या माणसावर त्यांनी तलवार कोयत्याने वार केले. यात विश्वजीत देशमुख य तरुणाचा खून झाला होता. तर भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या मयताचा मित्र सागर इंद्रा यास गंभीर जखमी करून आरोपी पसार झाले होते. याबाबत वडगाव मावळ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. अशा प्रकाराने अज्ञात इसमाविरुदध दाखल झालेला खुनाचा गुन्हा केवळ ऐकिव माहिती गाभिर्याने घेऊन त्याची खातरजमा करुन उघडण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास यश आले आहे.

बातम्या आणखी आहेत...