आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:जालन्याच्या ‘त्या’ तरुणाचा खून समलैंगिक संबंधांतून, हत्या करणारा विवाहित आरोपी मूळ हिंगोलीचा

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात पीएचडी करत असलेल्या जालन्याच्या तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी हिंगोलीच्या रविराज राजकुमार क्षीरसागर (२४, रा.लाक, ता.आैंढा, हिंगाेली) या तरुणाला अटक केली. सुदर्शन बाबुराव पंडित (३०, रा. जानेफळ, ता.जाफराबाद, जालना) या तरुणाचा २ दिवसांपूर्वी पुण्यात खून झाला होता. समलैंगिक संबंधांतून या तरुणाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आराेपीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पाेलिसांना सुदर्शन पंडित याचा २६ फेब्रुवारी राेजी मृतदेह सापडला. त्यानंतर पाेलिसांनी आराेपीचा शाेध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आराेपी रविराजचे नाव समोर आले. पाेलिस तपास करत असतानाच रविराजने राहत्या घरी सुसाइड नाेट लिहून आत्महत्येचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे आई-वडील घरी आले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मुलगा आढळला. त्याला वारजे येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले.

घटस्फोटापर्यंत प्रकरण : सुदर्शन हा काेथरूड परिसरात ५ मित्रांसोबत राहत हाेता. मागील काही महिन्यांपासून माेबाइलवर खूप बाेलत हाेता. ही माहिती मिळाल्यानंतर पाेलिसांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दाेन जणांची नावे शोधली. रविराजचे २ वर्षांपूर्वी लग्न हाेऊनही सुदर्शनसोबत संबंध होते. ते इतके वाढले की रविराजचे प्रकरण पत्नीसाेबत घटस्फोटापर्यंत गेले. सुदर्शनचा खून केल्यानंतर त्याने घरी जाऊन स्वत:च्याही गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

डेटिंग साइटवरून ओळख
दरम्यान, चतृशृंगी पाेलिसांनी आराेपीकडे तपास केला असता आठ महिन्यापूंर्वी दाेघांची डेटिंग साइटवरून आेळख हाेऊन प्रेमसंबंध तयार झाले. परंतु सुदर्शन पंडित याचे लग्न ठरल्याने मागील १५ दिवसांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. पंडित याचे लग्न झाल्यास ताे आपल्यापासून लांब जाईल या मानसिकतेतून त्याचा खून केल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...