आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पतीकडून पत्नीचा खून:पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत पुरले अन् नंतर जाळले

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने 30 वर्षीय पत्नीचा मित्रांसाेबत कट रचून दाेरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचे प्रेत जंगलात एक खड्डा करुन पुरले. मात्र, पुन्हा ते प्रेत खड्डया बाहेर काढून प्रेत जाळण्याचा प्रकार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

आशा गाेरक्ष देशमुख (वय-30) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती गाेरक्ष बबन देशमुख (35,रा.मेदनकरवाडी, चाकण, पुणे) , राेशन गजानन भगत (22,रा.मेदनकरवाडी,पुणे) व सासरे बबन शिवलिंग देशमुख (62,रा.पेडगाव, ता.श्रीगाेंदा, अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्या अन्य दाेन साथीदारांवर ही याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिस ठाण्यात याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम सिताराम गायकवाड यांनी गुरवारी रात्री फिर्याद दाखल केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

आराेपी गाेरक्ष देशमुख हा मुळचा अहमदनगर जिल्हयातील श्रीगाेंदा परिसरातील पेडगावचा रहिवासी आहे. मजुरी कामानिमित्त ताे कुटुंबा समवेत खेड परिसरातील मेदनकरवाडी याठिकाणी राहत हाेता. 29/8/2022 राेजी रात्री दाेन वाजता त्याने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन तिचा बाेरजाई माता मंदिरा जवळ साथीदार राेशन भगत, त्याचे दाेन मित्र यांच्या समवेत दाेरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर सर्वांनी मिळून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत आळंदी घाटात वन विभागाच्या जागेत एक खड्डा करुन पुरले. त्यानंतर एक ऑक्टाेबर राेजी मयताचा पती व सासरे यांनी सदर प्रेत खड्डयातून बाहेर काढून ते प्रेत जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी पाऊस येत असल्याने प्रेत अर्धवट जळाल्याने ते फाॅरेस्टचे जवळ असलेल्या तळयात फेकून देण्यात आले हाेते.

चाकण पोलिसांना सदर अर्धवट जळालेले प्रेत मिळाल्याने त्यांनी या गंभीर गुन्हयाचा तपास सुरु केला असता, पती व त्याच्या साथीदारांनीच महिलेचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एन राठाेड पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...