आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने भाेसकून खून,  पुण्यातील घटना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने भाेसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना येरवडा येथील जवाननगर येथे घडली. पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. ़अंकिता अनिल तांबूटकर (४५, रा. जय जवाननगर, येरवडा, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अनिल मनोहर तांबूटकर ( ५०) असे आरोपी पतीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल हा अंकिताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात भांडणे हाेत. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भांडणात राग अनावर झाल्याने अनिलने घरातील चाकूने तिच्यावर सपासप वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...