आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत आठवड्यात विश्रांतवाडी परिसरातील एका खदानीच्या पाण्यात दोघांचे मृतदेह आढळून आले होते. त्या दोघांचा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पुर्ववैमनस्य आणि मानलेल्या बहीणीला त्रास दिल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून झालेल्या वादावादीनंतर दोघांना दारू पाजून खदाणीमध्ये ढकलून देऊन हे दुहेरी हत्याकांड केल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी प्रसन्न थुल उर्फ गोट्या (वय 21,रा. पंचशिलनगर) याला अटक केली आहे. तर अनिकेत उरणकर उर्फ हुर्या (वय 24,रा. औंधरोड) याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मोहीत नानाभाऊ लंके (वय.18,रा. भिमनगरच्या पाठीमागे अनिरुद्ध अपार्टमेंट विश्रांतवाडी) याने फिर्याद दिली आहे. 7 जून रोजी विश्रांतवाडीतील भीमनगर परिसरात राहणारे विकी नानाभाऊ लंके (20) आणि सुशांत गडदे (20) हे दोघेजण बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती.
दरम्यान शनिवारी (ता.11) दुपारी विश्रांतवाडीतील पाण्याच्या खदाणीमध्ये त्यांचे मृतदेह आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी सुरवातीला मृत्यूची नोंद केली. मात्र, पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करीत लंके आणि बडदे बेपत्ता झालेल्या दिवशी कोणासोबत होते? याचा शोध घेतल्यानंतर त्यांचा खून झाल्याचे तपासात उघड झाले. त्यानूसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.