आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, वयाच्या 47 व्या वर्षी अखेरचा श्वास

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुळशी पॅटर्न, देऊळ बंद, सरसेनापती हंबिरराव मोहिते, पुष्पक विमान या चित्रपटांतील गाणी संगीतबद्ध केली होती

प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आज पहाटे (10 डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली आहेत.

नरेंद्र भिडे यांनी पेईंग घोस्ट, देऊळ बंद, बायोस्कोप, रानभूल, चि व चि सौ का, हम्पी, उबंटू, लाठे जोशी, पुष्पक विमान, 66 सदाशिव, मुळशी पॅटर्न यासारख्या सिनेमांतील गाण्यांनाही त्यांनी संगीत दिले. सरसेनापती हंबिरराव मोहिते हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतरही नरेंद्र भिडे यांच्यातील संगीतकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. मनोरंजन विश्वात पाऊल ठेवत त्यांनी अनेक चित्रपट गीतांना स्वरसाज चढवला. पुण्यातील डॉन स्टुडिओचे संगीत संयोजक आणि संचालक म्हणून ते कार्यरत होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser