आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंग्याचे राजकारण:राज ठाकरेंच्या बदललेल्या भुमिकेमुळे मुस्लिम कार्यकर्ते नाराज, पुण्यात पदाधिकाऱ्याचा राजीनामा, नेत्यांचीही गोची

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात जोरदार भाषण केले होते. ऐन रमजानच्या काळातच मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर त्यासमोरच मोठे भोंगे लावून हनुमान चालीसा ऐकवण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, या भुमिकेचे पडसाद आता मनसेमध्येच उमटत असल्याचे दिसत आहे. राज यांच्या अचानक बदललेल्या भूमिकेमुळे पक्षातील मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मनसेला याचा पहिला फटका पुण्यात बसला असून पुण्याचे मनसे पदाधिकारी माजिद शेख यांनी राजीनामा दिला आहे.

काय म्हण्णे आहे कार्यकर्त्यांचे?
राज ठाकरे यांच्या बदललेल्या पवित्र्याबद्दल माजिद शेख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज ठाकरे विकासाची ब्ल्यू प्रिंट आणणार म्हणून मी मनसेत प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी भूमिका बदलली याची खंत आहे. आम्हाला जमिनीवर काम करावे लागते. लोकांना उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे मी पुण्याचे मनसे प्रमुख वसंत मोरे यांच्याकडे राजीनामा देत असल्याचे माजिद शेख यांनी सांगितले आहे. तसेच, पुण्यात अजूह काही मुस्लिम पदाधिकारीही राजीनामा देणार असल्याचे माजिद शेख यांचे म्हण्णे आहे.

मनसे नेत्यांची गोची
राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे मनसे नेत्यांचीही गोची झाल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक प्रभागात मुस्लिम मतांची संख्या निर्णायक आहे. मनसे नेत्यांसोबत अनेक मुस्लिम कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून आतापर्यंत पक्षासाठी काम करत होते. पण, आता या नेत्यांना आपल्या मुस्लिम कार्यकर्त्यांना काय सांगायचे व जनतेला काय सांगायचे, असा प्रश्न पडला आहे. पुण्याचे मनसे प्रमुख वसंत मोरे यांनीदेखील याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक होत आहे. या बैठकीत या बदलेल्या भूमिकेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

कल्याणमध्येही पदाधिकारी नाराज
कल्याणचे मनसे प्रदेश सचिव इरफान शेख यांनीदेखील पक्षाच्या बदललेल्या भूमिकेबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्ष प्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समाज प्रश्न विचारु लागला आहे की, पक्षाची नेमकी भूमिका काय आहे ? पक्षात नेमके चाललंय काय ? 2009 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेतून मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांना मुस्लिम मतदारांनी मतदान केले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मेहनत घेतली होती. त्यानंतर 2019 साली कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांना देखील मुस्लिमांनी मतदान केले. त्यामुळे समाजाला आता कसा सामोरे जाऊ, असा सवाल त्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...