आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:मुस्लिम बांधवांनी एकत्र येत केला काेविडग्रस्त ख्रिश्चन महिलेचा दफनविधी

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेराेना वातावरणातही समाजाला दिला सर्वधर्मसमभावाचा संदेश

पुण्यात काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात झाला असून आतापर्यंत ४०० जणांचा यामध्ये बळी गेला आहे. काेराेनाची लागण हाेऊन मृत झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबातील मंडळीही येत नसल्याची दुर्दैवी बाब असून अनेक स्वयंसेवी संस्था अशाप्रसंगी पुढे आले आहे. मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या सदस्यांनी अशाच प्रकारे हडपसर भागातील वैदवाडी येथील ख्रिश्चन दफनविधी ठिकाणी काेराेनाग्रस्त मृत झालेल्या एका ख्रिश्चन महिलेचा दफनविधी करत अल्फा आेमेगा ख्रिश्चन महासंघाच्या सदस्यांना काेराेनाने मृत झालेल्या व्यक्तींचे दफनविधी पीपीई किट घालून सुरक्षितरीत्या कशा प्रकारे करावयाचे याचे प्रात्यक्षिकच करून दाखवले आहे.

पुण्यातील एमआयएमच्या नगरसेविका अश्विनी डॅनियल लांडगे यांना संबंधित मृत महिलेच्या पतीने फाेन करून माझी पत्नी काेराेनाने मृत झाली असून तिचे अंत्यसंस्कार अग्नी देऊन करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्या वेळी नगरसेविका लांडगे यांनी महानगरपालिकेच्या आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी बाेलून करून अंत्यविधी ख्रिश्चन रीतिरिवाजानुसार करण्यासाठी अल्फा आेमेगा महासंघाला परवानगी देण्यात यावी अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली. सदर परवानगी मिळाल्यानंतर डॅनियल लांडगे, अँथाेनी वाकडे, शैलेंद्र भाेसले, विजय आल्हाट असे सर्वजण एकत्रित सेंट पॅट्रिक येथील फादर लुईस यांच्याकडे नातेवाइकांसाेबत गेले. त्यांच्याकडून स्मशानभूमी परवानगी घेतली व त्याअनुषंगाने लागणारे सर्व महापालिकेच्या कागदांची पूर्तता केली. त्यानंतर हडपसर फातिमानगर येथील इंडियन ख्रिश्चन सिमेट्री येथे जाऊन अंत्यसंस्कारासाठी खड्डा घेण्याचे सांगितले. त्या वेळी तेथे कामकाज पाहणारे व्यवस्थापकांनी मृताच्या नातेवाइकांनी  स्वत: जेसीबीच्या साहाय्याने खड्डा घ्यावा असे सूचित केले. परंतु त्या वेळी सदर खड्डा करण्याकरिता काेणी पुढे येत नसल्याने पुणे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे जर अशा वेळेस कुठल्याही व्यक्तीने मृताची हेळसांड केली अथवा अंत्यसंस्कार करण्यास दिरंगाई केली किंवा अडथळा आणल्यास फाैजदारी गुन्हा दाखल हाेईल याबाबत आदेश दाखवले. त्यानंतर तेथील कामगारांनी खड्डा करण्यास मदत केली. अंत्यविधीसाठी अल्फा आेमेगा ख्रिश्चन महासंघाचे पदाधिकारी यांना काेविड आजाराने मरणाऱ्या व्यक्तीची कशा पध्दतीने दफन केले पाहिजे याबाबत अंत्यविधी करण्यासाठी मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, जमीर माेमीन साबीर सय्यद, अमजद शेख, साबीर ताेपखाना, दानिश खान, शेख इब्राहिम यांनी प्रत्यक्षरीत्या दफन विधी करून दाखवले. तसेच काही सहकारी यांच्या मदतीने फादर लुइस यांच्या प्रार्थनेने संपूर्ण अंत्यसंस्कार पार पडला.

बातम्या आणखी आहेत...