आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्‍हणाले:शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान असणे आवश्यक

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी क्षेत्रात आधुनिक ज्ञान आणि प्राचीन ज्ञानाचा संगम करून पुढे जाण्याची गरज आहे. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासह दुग्धव्यवसाय व शेतीशी निगडित जोड व्यवसायांतील सर्वांगीण ज्ञान प्राप्त करुन काम केल्यास कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनणे शक्य आहे, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व ॲग्रीव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयात ‘महा ॲग्रीव्हिजन २०२२’ च्या तिसऱ्या क्षेत्रीय संमेलनाच्या उद्घाटनात राज्यपाल कोश्यारी बोलत होते. ‘नैसर्गिक व सेंद्रिय शेती: जागतिक परिपेक्ष आणि कृषि उद्योजकता’ हा या दोन दिवसीय संमेलनाचा मुख्य विषय आहे. कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, गुजरात नॅचरल अँड ऑरगॅनिक फार्मिंग अँड ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आनंदचे कुलगुरू डॉ. सी. के. टिंबाडिया, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...