आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एईएसए पुरस्कारांचे वितरण:स्थापत्य अभियंता, वास्तुविशारद यांच्यातील परस्पर सहयोग महत्वाचा - डॉ. उज्ज्वला चक्रदेव

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थापत्य अभियांत्रिकी आणि वास्तुकला एकमेकांना पूरक आहेत. वास्तुविशारद प्रकल्पाच्या बांधकामाचा आराखडा तयार करतो, तर त्याला मूर्त रूप देण्याचे काम स्थापत्य अभियंते करतात. त्यामुळे चांगल्या प्रकल्प निर्माणासाठी स्थापत्य अभियंता, वास्तुविशारद यांच्यातील परस्पर सहयोग महत्वाचा ठरतो असे मत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी बुधवारी व्यक्त केले.

आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर असोसिएशनच्या (एईएसए) वतीने 27व्या एईएसए पुरस्कारांचे वितरण झाले. ज्येष्ठ स्थापत्य अभियंता एम. बी. नाम्बियार व ज्येष्ठ आर्किटेक्ट श्रीकांत निवसरकर यांना 'एईएसए जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक अशोक चोरडिया, 'एईएसए'चे अध्यक्ष पुष्कर कानविंदे, उपाध्यक्ष पराग लकडे, आर्किटेक्ट ख्रिस्तोफर बेनिंजर, संयोजक विश्वास कुलकर्णी आदी उपस्थित होते.

नाम्बियार यांनी अनेक गुणवत्तापूर्ण आणि आव्हानात्मक प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण केले आहेत. जवळपास सहा दशके त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. बांधकाम क्षेत्रातील गुणवत्ता आणि सुरक्षा याबद्दल त्यांना अनेक नामवंत संस्थांनी गौरवले आहे. बांधकाम क्षेत्राबरोबरच त्यांनी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा छंद जोपासला आहे. नाम्बियार यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा 'एईएसए जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.

शिकण्याची वृत्ती ठेवावी -

एम. बी. नाम्बियार म्हणाले, या संस्थेशी गेली अनेक वर्षे संलग्न आहे. 80 व्या वाढदिवसाच्या दिवशी हा मोठा सन्मान प्राप्त होतोय, याचा आनंद आहे. कोणताही व्यवसाय टीमवर्कच्या योगदानातून यशस्वी होतो. माझ्या प्रवासातही माझे सर्व सहकारी, कुटुंबीय यांच्या एकत्रित योगदानामुळे मिलेनियम इंजिनिअर्सचा व्यवसाय यशस्वीपणे उभा राहिला. अनेक अभियंते, आर्किटेक्ट या प्रवासात मिळाले. प्रत्येक प्रकल्पातून शिकायला मिळाले. तरुण पिढीने ही शिकण्याची वृत्ती ठेवून सुंदर निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...