आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आपण कोरोनाची नव्हे, तर प्रतिकारशक्ती वाढवणारी बीसीजी लस घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. पवार यांनी शुक्रवारी कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूला भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
८० वर्षीय शरद पवार कोरोना संसर्गाच्या लाटेतही राज्यभर दौरे करून बैठका घेत आहेत. त्यामुळे त्यांनी कोरोना लस घेतली असावी अशी चर्चा होती. शुक्रवारी सकाळी शरद पवारांनी दुसऱ्यांदा सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. आपण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीची बीसीजी लस घेतली असून माझ्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली. आिण ज्या लसीची सर्वांना उत्सुकता लागली आहे ती लस जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.
पार्थ पवारांना टोला
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी हीच सरकार व राष्ट्रवादीची भूमिका आहे, घटनापीठाकडे सुनावणी जावी यासाठी सरकार आग्रही आहे. आरक्षण मागणीसाठी कुणीही आत्महत्या करणे योग्य नाही. स्थगिती उठवण्यासाठी सरकार कोर्टात गेले, आणखी कुणी जात असेल (पार्थ) तर जावं.. १० जणांनी जावं पण सरकार आधीच न्यायालयात गेले आहे, असा टोला पवारांनी नातू पार्थला लगावला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.