आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कभी कभी लगता है अपुन ही भगवान है:पटोलेंची मोदींवर टीका; पालखीमार्गावर विठ्ठलाहून मोठा फोटो लावल्याने चिमटा

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कभी कभी लगता है अपुन ही भगवान है' या शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. भाजपने पुण्यात पालखीमार्गावरच नरेंद्र मोदी यांचा हा भव्य फ्लेक्स लावला आहे. यावरून नाना पटोले यांनी ट्विट करत चिमटा काढला.

नाना पटोले यांनी ट्विटमध्ये म्हटले की, भाजपाने पुण्यात पालखीमार्गावरच नरेंद्र मोदी यांचा हा भव्य फ्लेक्स लावला... विठू माऊली, संत ज्ञानेश्वर , संत तुकोबा हे मात्र दिसणार नाहीत. कभी कभी लगता है अपुन ही भगवान है !

विठ्ठलापेक्षा मोदींचा फोटो मोठा

यापूर्वीदेखील भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू (14 जून ) दौऱ्यावर होते. तेव्हा शहरात मोठे स्वागताचे फलक लावले होते. एका बॅनरवर विठ्ठलापेक्षा मोठा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लावला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी विठ्ठला पेक्षा मोदींचा फोटो मोठा असल्याने हा वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याचे म्हटले होते. . विठ्ठला पेक्षा कोणीही मोठे नाही असा उल्लेख करत हे भाजपाने जाणीवपूर्वक केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

स्वागत फलकावर विठ्ठलापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा फोटो
स्वागत फलकावर विठ्ठलापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा फोटो

आषाढी यात्रा उत्साहात

यंदा कोरोना निर्बंध उठवल्याने आषाढी वारीमध्ये उत्साही वातावरण आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पंढरीच्या वाटेवर पायी चालून सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला जाण्यासाठी वैष्णवजण आतुर झाले आहेत. संत तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून प्रस्थान ठेवले आहे. त्यानंतर 21 जूनला माऊलींची पालखी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. वारकरी व भाविकांना पालखी मार्गावर, पालखी तळावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

बातम्या आणखी आहेत...