आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिक्की महिला उद्योजिकांचे राष्ट्रीय प्रदर्शन:नारायण राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन; अभिनेता जॅकी श्रॉफ, शत्रुघ्न सिन्हांची प्रमुख उपस्थिती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फिक्की महिला आघडी पुणे यांच्या वतीने येत्या 8 नोव्हेंबरला 2022 रोजी पुण्यातील ऑक्सफर्ड रिसोर्ट बावधन येथे महिला उद्योजिकाचे राष्ट्रीय प्रदर्शन व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी देशभरातील फिक्की महिला आघाडीच्या उद्योजिका उपस्थित असणार आहेत.

दोन दिवस कार्यक्रम

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिध्द अभिनेता जॅकी श्रॉफ व शत्रुघ्न सिन्हा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. जागतिक शांततेसाठी उभारल्या जाणाऱ्या शांतता स्तंभाचे उद्घाटन या दोन दिवसीय कार्यक्रमात होणार आहे. 8 आणि 9 नोव्हेंबर 2022 रोजी दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

महाराष्ट्राची लोकधारा, संस्कृती तसेच इतिहास सांगणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राची पंगत ही या कार्यक्रमात अनुभवण्यास मिळणार आहे. तसेच कोटक महेंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश शहा हे महिला उद्योजिकाना मार्गदर्शन करणार आहेत .यावेळी हस्तकला तसेच विविध दुर्मिळ वस्तू व कलेचा अनुभव घेता येणार आहे. या महोत्सवास फिक्की महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा जयंती दालमिया उपस्थित रहाणार आहेत त्यांच्या उपस्थितीत संस्थेचा 8 वर्धपान दिन साजरा करण्यात येणार आहे.

गोल्फ मॅच रंगणार

महिलांच्या गोल्फ टुर्नामेंटसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक व पुणे फिक्कीच्या अध्यक्षा नीलम सेवलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फिक्कीच्या माजी अध्यक्षा उषा पुनावाला ,उपाध्यक्षा रेखा मगर, खजिनदार सोनिया राव, सेक्रटरी अनिता अग्रवाल ,पिंकी राजपाल व इतर फिक्की महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...