आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांचा पुणे दौरा:कोरोना लसीचे उत्पादन घेणाऱ्या सीरम इन्स्टिटय़ूटला नरेंद्र मोदी देणार भेट

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीरम इन्स्टिटय़ूटच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त

अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरोना आजारावरील कोवीशिल्ड लसीसे उत्पादन घेणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. नरेंद्र मोदी शनिवारी (28 नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर येणार असून, शनिवारी दुपारी कंपनीला भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतील. दरम्यान, मोदींच्या दौऱ्यापुर्वीच कंपनीच्या आसपासच्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने मोदी दुपारी साडेबाराच्या सुमारास लोहगाव येथील विमानतळावर दाखल होतील. तेथून हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिटय़ूटला जातील. पुण्यातील मांजरी भागात असलेल्या सीरम इन्स्टिटय़ूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीत कोवीशिल्ड लस तयार केली जात आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी उद्या पंतप्रधान मोदी येणार आहेत. यादरम्यान, सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी मोदी संवाद साधतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser