आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना लसीकरण:कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत नाशिक शहर आघाडीवर; तर पुण्याने गाठला मुलांच्या लसीकरणाचा नवा टप्पा

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने कोरोना लसीकरणाला मागील नवीन वर्षांपासुन सुरूवात केली. तसेच या 16 मार्च पासुन लहान मुलांच्या लसीकरणाला सुरूवात केली. राज्यात लहान मुलांच्या लसीकरणाचा आकडा हा सर्वाधिक आहे. तसेच आता पुणे शहरात कोरोना लसीकरणाने एक नवा टप्पा गाठल्याचे समोर आले आहे. लसीकरण्याच्या वाढत्या टप्पामुळे एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. पण महत्वाची बाब म्हणजे पुणे लसीकरण मोहिमेच्या बाबतीत पहिल्या आघाडीवर नसुन, नाशिक शहराने आघाडी घेतली आहे. दरम्यान कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत नाशिक शहरानंतर पुण्याचा नंबर लागतो.

राज्यात एकूण 36 टक्के लसीकरण आजतागायत झाले आहे. एकूण 39 लाख मुलांचे लसीकरण अद्याप बाकी आहे. पुणे, नाशिक यात वेग घेत आहेत. मात्र राज्यातील इतर जिल्ह्यांतला लसीकरणाचा वेग या दोन शहरांच्या तुलनेत कमी आहे. मुंबईत तर केवळ 38 हजार मुलांचेच लसीकरण पूर्ण होऊ शकले आहे. संख्येच्या मानाने हा आकडा कमी आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहराने लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे बनले आहे.

काय म्हणाले लसीकरण अधिकारी?
लसीकरण कमी होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यात सुरू असलेल्या मुलांच्या परीक्षा. असे कारण लसीकरण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 12 ते 14 वयोगटातील परीक्षांमुळे या मुलांचे लसीकरण संथगतीने सुरू आहे. परीक्षा संपल्यानंतर पुन्हा या मुलांच्या लसीकरणाला वेग येईल. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई म्हणाले आहेत.

16 मार्चपासून झाले मुलांचे लसीकरण सुरू
केंद्र सरकारने 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास परवानगी दिली आहे. त्यानंतर या मुलांचे लसीकरण सुरू झाले. सध्या तरी नाशिक आणि पुणे या जिल्ह्यात लसीकरणाचा वेग योग्य आहे. मात्र परीक्षा कालावधीमुळे काहीसा वेग मंदावला आहे. पुण्यात तीन लाख 57 हजार मुलांना लस द्यायची आहे. एका व्हायलमध्ये 20 मुलांना डोस देता येतो; पण तेवढी मुले येईपर्यंत व्हायल फोडली जात नसल्याने मुलांसह पालकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...