आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:अन् पंकजा मुंडे यांचा अचानक सिटी बसमधून प्रवास, कार्यकर्त्यांसह प्रवाशीही आश्चर्यचकित

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज सकाळी अचानकपणे शहरातील सिटीबसमधून प्रवास करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. विशेष म्हणजे त्यांनी हा प्रवास तिकीट काढून केला.

पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी माऊली नगरातील एका गृह प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम संपवून त्या बाहेर आल्या आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या सिटी बसमध्ये बसल्या, या प्रसंगाने कार्यकर्ते व प्रवासी आश्चर्यचकित झाले. त्यांच्यासमवेत आमदार जयकुमार रावल, आमदार सीमा हिरे, महापौर सतीश कुलकर्णी होते.

बसमधील वाहकांकडून तिकिट काढून त्यांनी सावरकर नगर ते अशोकनगर असा प्रवास केला. ही बस सेवा अल्पावधीतच अतिशय उपयुक्त ठरली असून महापालिकेने सुमारे 250 बस यासाठी रस्त्यावर उतरवल्या आहेत. या सेवेच्या उत्कृष्ट सोयीबद्दल केंद्र सरकारने नुकताच पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. या सेवेबद्दल पंकजा मुंडे यांनी महापौरांचे विशेष कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...