आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी अंक स्पर्धा:नवल, शब्दमल्हार, उद्याचा मराठवाडा, जीवन शिक्षण, पुणे पोस्ट हे दिवाळी अंक ठरले राज्यातील सर्वोत्कृष्ट

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धा (२०२२) चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेसाठी या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून १५० हून अधिक दिवाळी अंक आले होते. अ. स. गोखले स्मृत्यर्थ ‘रत्नाकर पारितोषिक’, ‘नवल’ या दिवाळी अंकाला चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत ‘विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक’, ‘शब्दमल्हार’ या दिवाळी अंकाला ‘मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक’, ‘उद्याचा मराठवाडा’ या दिवाळी अंकाला ‘शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक’, ‘पुणे पोस्ट’ या दिवाळी अंकाला देण्यात आले. त्याचबरोबर कै. विमल कचरू भालेराव स्मृतिप्रीत्यर्थ ऑनलाइन दिवाळी अंकाचे पारितोषिक ‘गीताई’ दिवाळी अंकाला शुक्रवारी जाहीर करण्यात आले.

जानकीबाई केळकर स्मृत्यर्थ ‘उत्कृष्ट बालवाङ्मय पारितोषिक’ हे ‘जीवन शिक्षण’ या दिवाळी अंकाला, दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठी ‘दि. अ. सोनटक्के पारितोषिक’ हे ‘सह्याचल’ या दिवाळी अंकातील संध्या सोळंखे-शिंदे यांच्या ‘माउली’ या कथेला, तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे ‘अनंत काणेकर पारितोषिक’ हे ‘शब्दरुची’ या दिवाळी अंकातील सुरेश लोटलीकर यांच्या ‘नि:शब्द व्यंगचित्रांचा महर्षी’ या लेखाला जाहीर करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. अविनाश सांगोलेकर, अनिल गुंजाळ आणि डॉ. प्रतिमा जगताप यांनी काम पाहिले. त्यांनी सर्व दिवाळी अंक वाचून काढले आहेत.

राजन खान यांच्या हस्ते सोमवारी होणार पुरस्कार वितरण या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, १३ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडणार आहे. या सोहळ्यात देशातील प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त अंकाला गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांसह माहिती ग्रंथालय विभागाचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...