आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाउ इज द जोश:NDA चा दीक्षांत समारंभ: रिव्ह्यू ऑफिसर म्हणून पोहोचलेल्या नौदल प्रमुखांनी कॅडेट्स सोबत काढले पुश-अप्स, विचारले - हाउ इज द जोश!

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) च्या 140 व्या कोर्समध्ये 300 पेक्षा जास्त कॅटेड्सचा पासिंग आउट परेड शनिवारी सुरू झाला. या दरम्यान, परेडची सलामी घेण्यासाठी भारतीय नौदलाचे प्रमुख चीफ अॅडमिरल करमबीर सिंह पोहोचले. ते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि रिव्ह्यू ऑफिसर सुद्धा होता. या दरम्यान, त्यांनी कॅडेट्ससोबत चक्क पुश-अप्स काढून दाखवल्या. यानंतर कॅडेट्सला 'हाउ इज द जोश' असेही म्हटले. त्याला सर्वांनी एका सुरात 'हाई सर' असे उत्तर दिले.

कोरोनामुळे संरक्षण संस्थांमधील कार्यक्रांवर मर्यादा आली आहे. एनडीएच्या दीक्षांत संचलन सोहळाही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पहाटे ६ च्या सुमारास संचलन सोहळ्यास सुरुवात झाली. वर्षातून दोन तुकड्या एनडीएतून त्यांचे ३ वर्षांचे खडतर प्रशिक्षण करून सशस्त्र दलात दाखल होतात. पुण्यात लष्कर, हवाई दल आणि नौदल अधिकाऱ्यांचे प्राथमिक प्रशिक्षण केले जाते. येथून 3 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते एका वर्षासाठी आप-आपल्या अकादमीत अंतिम प्रशिक्षण घेतात.

तत्पूर्वी शुक्रवारी नौदल प्रमुख करमबीर सिंह यांची वेगळीच शैली कॅडेट्सला दिसून आली. 61 वर्षीय सिंह यांनी कॅडेट्ससोबत चक्क पुश-अप्स काढले. यानंतर आपल्या हंटर-स्क्वाड्रन (हाउस आणि हॉस्टेल) मध्ये सुद्धा गेले. याच ठिकाणावरून त्यांनी 41 वर्षांपूर्वी एनडीएचा कोर्स पूर्ण केला आणि नौदलात सामिल झाले.

किती पुश-अप्सच्या प्रश्नावर उत्तरले...
नौदल प्रमुखांनी पुश-अप्स काढल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित कंपनी हवालदार मेजरने विचारले की सर तुम्ही किती पुश-अप्स काढले. त्यावर हसतमुखाने जितक्या शक्य होत्या असे नौदल प्रमुख उत्तरले. नौदल प्रमुखांच्या या अनोख्या शैलीचे फोटो यानंतर सोशल मीडियावर चर्चेत आहेत. डिफेन्स इंटेलिजेंस एजन्सी चीफ, लेफ्टनेंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी हे फोटो ट्विट करताना लिहिले, एक लीडर नेहमीच पुढाकार घेऊन नेतृत्व करतो. त्यांचे हे ट्विट इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ (IDS) मुख्यालयने सुद्धा रीट्विट केले.

तिन्ही दलांचे प्रमुख एकाच बॅचचे
उल्लेखनीय बाब म्हणजे, सध्या असलेले नौदल प्रमुख करमबीर सिंह, लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे आणि हवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल आरकेएस भदौरिया हे तिघे एकाच बॅचचे आहेत. सगळेच NDA च्या 1980 च्या बॅचचे पास आऊट झालेले अधिकारी आहेत.

बातम्या आणखी आहेत...