आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदार महेश लांडगेंची जीभ घसरली:म्हणाले- नवाब मलिक हे देशद्रोही आहेत, त्यांना अटक करुन चालणार नाही, तर भर चौकात फाशी द्या

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर विरोधकांकडून (भाजप) सातत्याने हल्लाबोल होत आहे. भाजप नेते त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. पुण्या-मुंबईसह संपूर्ण राज्यात मलिक यांच्या विरोधात निदर्शने होत आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही मलिक यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भाषा केली. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी मतदारसंघातील भाजप आमदार महेश लांडगे यांचे मलिक यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. एका आंदोलनादरम्यान ते म्हणाले की, मलिक हे देशद्रोही असून त्यांना रस्त्याच्या मधोमध फाशी देण्यात यावी.

महाविकास आघाडी सरकारमधील कोणत्या ना कोणत्या मंत्र्यांवर दररोज भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, मात्र मलिक यांच्यावरील आरोप कोणीही भारतीय खपवून घेणार नाही, अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये केली. दाऊदसारख्या देशद्रोही व्यक्तीशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अशा मंत्र्याला नुसते अटक करून चालणार नाही, तर भर चौकात फाशी दिली पाहिजे.

नवाब मलिकांना कोणीही माफ करणार नाही
लांडगे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार जातीवादाचे आणि धर्माचे राजकारण करत आहे. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे नेते बाहेर पडत आहेत, माझा प्रश्न आहे की ते ज्यांना पाठिंबा देत आहेत ते भारत सोडून पळून गेले आहे. तुम्हाला विचारून तो पळाला का? दाऊदला पळून जाण्यात मदत केली का? त्यामुळेच नवाब मलिकांसारख्या देशद्रोह्याला भारतातील कोणताही नागरिक माफ करणार नाही, त्यांचा राजीनामा सरकार स्वीकारो अथवा न स्वीकारो, पण त्यांना कोणीही माफ करणार नाही.

पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

राजीनामा न दिल्यास भाजपचे आंदोलन
माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी सांगितले की, "महाराष्ट्र सरकारने मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा स्वीकारला नाही, तर भाजप त्याचा निषेध करेल आणि हे सरकार दहशतवादी गुन्हेगारांशी संबंध ठेवणाऱ्यांचा पर्दाफाश करेल."

बातम्या आणखी आहेत...