आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मविआच्या विजयावर पवारांची प्रतिक्रिया:पवार म्हणाले- 'धुळे-नंदुरबारच्या निकालाचे आश्चर्य नाही, इतर भागांत मिळवलेला विजय महत्वाचा, महाराष्ट्रातील चित्र आता बदलतेय

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. या बदलाला महाराष्ट्रातील लोकांचा पाठींबा आहे

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निकालांमध्ये भाजपला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपच्या बालेकिल्ल्यांत पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात 20 वर्षांनंतर भाजपला पराभवाचे तोंड पाहवे लागले आहे. तर संघभूमी आणि भाजपचे मुख्यालय असणाऱ्या नागपुरात 1958 नंतर पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार पराभूत होत महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'धुळे आणि नंदुरबारचा निकाल आश्चर्यकारक नाही. कारण त्या ठिकाणचे उमेदवार हे विद्यमान आमदार होते. त्यांनी पक्षांतर केल्यामुळे राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवली. यामुळे त्यांचा विजय खरा विजय म्हणता येणार नाही. मात्र इतर ठिकाणचा निकाल हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती आहे' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे.

पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. याविषयी प्रतिक्रिया देतांना पवारांनी भाजपला टोला लगावला आहे. 'नागपूर पदवीधर मतदारसंघ 5 दशकांपासून भाजपकडे होता. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे ही जागा गेली अनेक वर्ष होती. पुण्यातील पदवीधर मतदारांनीही आम्हाला समर्थन दिलेले नव्हते. पण यावेळी पुण्याचा निकालही मोठ्या मतांनी स्पष्ट झाला आहे. हा बदल म्हणजे महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. या बदलाला महाराष्ट्रातील लोकांचा पाठींबा आहे, असे या निकालातून दिसते' असे पवार म्हणाले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser