आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात राहणारे हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज समान आहेत. आपण सर्व हिंदूच आहोत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. भागवत यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना चिमटा काढला आहे. मोहन भागवत यांच्या विधानाने माझ्या ज्ञानामध्ये भर पडली आहे असा टोला पवारांनी लगावला आहे. पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मोहन भागवतांच्या वक्तव्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, 'भागवत सर्व धर्म एकच समजतात. चांगली गोष्ट आहे. दोन्ही समाजाचा मूळ जन्म एकाच कुटुंबातून झाला ही नवीन गोष्ट त्यांनी सांगितली आहे. यामुळे माझ्याही ज्ञानात भर पडली.' असा टोला शरद पवारांनी लगावला.
काय म्हणाले होते मोहन भागवत?
ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनने आयोजित केलेल्या 'राष्ट्र प्रथम-राष्ट्र सर्वोपरि' या विषयावरील सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी मोहन भागवत सोमवारी मुंबईत आले होते, जिथे त्यांनी मुस्लिम विद्वानांची भेट घेतली. भागवत म्हणाले की, भारतात राहणारे हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज समान आहेत. भारतात मुस्लिमांनी घाबरण्याची गरज नाही. हिंदू हा शब्द आपल्या मातृभूमी, पूर्वज आणि संस्कृतीच्या समृद्ध वारसा समान आहे आणि प्रत्येक भारतीय हिंदू आहे. त्यामुळे समंजस मुस्लिम नेत्यांनी कट्टरवाद्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.