आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे कोरोना:राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे कोरोनामुळे निधन, शरद पवारांकडून घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलै रोजी कोरोनानमुळे निधन झाले

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलै रोजी कोरोना संसर्गामुळे निधन  झाले. साने यांच्या निधनानंतर आज (7 जुलै) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साने यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पोहोचले त्यांच्या घरी पोहचले. यावेळी शरद पवारांनी दत्ता सानेंना श्रद्धांजली वाहिली.

साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. सुरुवातीला त्यांना काही प्रमाणात कोरोनाची लक्षणे आढळली होती. तेव्हापासून त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु होते. मात्र, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. याच दरम्यान त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याने 4 जुलै रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर आज शरद पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली.

0