आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना संसर्गामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा मृत्यू

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या 24 तासांत पुणे शहरात 1199 नवीन कोरोना रुग्ण आढळले
  • जिल्ह्यातील रूग्णांची एकूण संख्या 26146 वर पोहोचली असून 882 लोकांचा मृत्यू झाला आहे

पुणे हे राज्यातील कोरोनाच्या संसर्गामुळे प्रभावित दुसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. येथे आतापर्यंत 26 हजारांपेक्षा जास्त रुग्ण झाले असून जवळपास 880 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

साने विरोधी पक्षनेते राहिले होते

दत्ता साने हे राष्ट्रवादीचे जुने नेते होते आणि ते पिंपरी चिंचवड नगरपालिकेत विरोधी पक्षनेते राहिले होते. त्यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे आज त्यांचा मृत्यू झाला. दत्ता साने यांच्या निधनानंतर इतर नगरसेवकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुण्यात 1199 नवीन कोरोना रुग्ण आढळले

पुणे शहरात मागील 24 तासांत कोरोनाचे 1199 नवीन रुग्ण सापडले. यासोबत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 26146 वर पोहचली आहे. काल दिवसभरात 792 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 16156 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. याशिवाय पुण्यात काल 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर आतापर्यंत 882 जणांचा बळी गेला आहे.

0