आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपला प्रत्युत्तर:बारामतीचा गड कधीही सर करू शकणार नाहीत, भाजपचे स्वप्न स्वप्नच राहिल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप बारामतीचा गड कधीही सर करू शकणार नाहीत. बारामतीचा मतदारसंघ काबिज करण्याचे भाजपचे स्वप्न हे स्वप्नच राहिल, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांना दिले आहे.

भाजपचे मिशन बारामती

मिशन मुंबईनंतर भाजपने आपला मोर्चा शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीकडे वळवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी देशात आतापर्यंत अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. वेळ कधी बदलेल सांगता येत नाही, असे म्हणत बावनकुळेंनी थेट शरद पवारांना आव्हान दिले आहे.

भाजपला यश मिळणार नाही

यावर महेश तपासे म्हणाले, संसदरत्न असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ आपण काबिज करु, असे स्वप्न भाजप पाहत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीमध्ये लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला चांगले विजय मिळेल, असे वक्तव्य केले आहे. मात्र, भाजपचे हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. भाजप बारामतीचा गड कधीच सर करू शकणार नाही.

बारामतीत समाजकारण चालते

महेश तपासे म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांचा परिचय राजकारणी म्हणून कमी व समाजकारणी म्हणून अधिक आहे. पवार कुटुंबीयांनी बारामतीचा मतदारसंघ राजकारणाने नव्हे समाजकारणाने बांधला आहे. मात्र, राजकारण करणे ही भाजपची एकमेव भूमिका आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांना समाजकारणाचे बाळकडू शरद पवारांनी दिले आहे. म्हणूनच भाजप बारामती लोकसभेचा सतदारसंघ कधीही सर करू शकणार नाही.

मोदी राजवटीत सुळेंना संसदरत्न

महेश तपासे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही बोचरी टीका केली. तपासे म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे हे नव्याने प्रदेशाध्यक्ष बनले आहेत. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांसमोर काही तरी आक्रमक बोलावे लागेल, हे स्वाभिक आहे. मीडियासमोर असे बोलल्याशिवाय बातमी होत नाही. मात्र, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे काम कसे आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. भाजपमध्येही त्यांच्या कामाची स्तुती करणारे अनेकजण आहे. त्यामुळेच मोदी राजवटीमध्येदेखील त्यांना संसद रत्न मिळाला, हे बावनकुळेंनी विसरू नये

बातम्या आणखी आहेत...