आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता वहिनींनी रामदेवबाबांच्या कानाखाली मारायला हवी होती:महिलांवरील वक्तव्यावरुन रुपाली ठोंबरे संतप्त

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''महिलांनी कपडे नाही घातले तरी छान दिसतात असे रामदेवबाबा यांनी म्हणताच, अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ताबडतोब कानशिलात मारायला हवी होती. पुन्हा असे बेताल वक्तव्य केले तर त्यांना काळे फासू, महाराष्ट्रातही फिरू देणार नाही असा सज्जड दम राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे - पाटील यांनी आज दिला.

धाडस करू नका

रामदेव बाबांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका होत असून यावर राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे - पाटील संताप व्यक्त करीत रामदेव बाबांना एक सल्ला दिला. रुपाली ठोंबरे म्हणाल्या, डोके खाली करा, पाय वर करा, त्याला शिर्षासन म्हणतात. अर्धा तास नाही, चार तास करा त्यामुळे तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा होईल. महिलांच्या अस्मितेवर महिलांना वाट्टेल ते धाडस करू नका. जर तसे केले तर त्यांना पुण्यात आल्यावर काळे फासू.

वक्तव्य कोणत्या चौकटीतले

रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या,. महिलांनी काहीच नाही घातले तर ते त्या छान दिसतात हे वक्तव्याचा मी निषेध करते. रामदेवबाबा तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असेल तर तो तुमच्याच शिर्षासनाद्वारे वाढवून घ्या. योगगुूरू आहात, योगा, स्वास्थ आणि मेंदुवर कंट्रोल करायला शिकवता, तुमचे वक्तव्य कुठल्या चौकटीत बसते.

आमची गॅंग तयार करू

रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ​​​​​​राज्यपाल ते रामदेवबाबा आणि भाजपचे लोक महिलांना, महापुरूषांना टार्गेट करतात. आता तर अमृता फडणवीसांसमोरच रामदेवबाबांनी बेताल वक्तव्य केले. महिलांच्या बाबतीत कोणतेही बेताल वक्तव्य यापूढे आले तर आमची गॅंग तयार करून या अशा लोकांवर कारवाई करावी लागेल. त्याला जबाबदार हे सरकार असेल.

रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेवबाबा म्हणाले, ''साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. रामदेवबाबांनी हे वक्तव्य खुद्द अमृता फडणवीसांसमोर केले. या कार्यक्रमात अनेक महिलाही होत्या.

बातम्या आणखी आहेत...