आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबिल ओढा प्रकरण:खा. सुप्रिया सुळे यांनी आंबिल ओढा पीडितांशी साधला संवाद; त्यांच्या समोरच अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा राजकारण करण्याचा विषय नाही - सुळे

पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील नागरिकांनी आपली घरे बांधून देण्याच्या मागणीसाठी पुणे महानगर पालिकेसमोर आजपासून ठिय्या देत आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, यामध्ये वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते आणि स्थानिक लोक आणि महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी भेट पीडितांशी संवाद सांधला.

यावेळी त्यांनी महानगर पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाई संदर्भांत संपूर्ण माहिती जाणून घेतली. चर्चेदरम्यान, सुळे यांच्या समोर आंदोलकांनी अजित पवार मुर्दाबादच्या घोषण्या दिल्या. त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी अजित पवारांच्या पालकमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी ही केली.

हा राजकारण करण्याचा विषय नाही - सुळे
आंबिल ओढा प्रकरण हे संवेदनशील विषय असून येथे कोणीही राजकरण करु नये असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला. मी इथं राजकरण करण्यासाठी आले नसून हा तुम्ही आम्ही मिळून हा प्रश्न कसा मार्गी लावता येईल यासाठी आले आहे. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी हा पलटवार केला.

न्यायालयाकडून तुर्तास दिलासा
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात महानगर पालिकेकडून 24 जून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिस-प्रशासन आमनेसामने आले होते. लोकांनी कारवाईदरम्यान आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला होता. त्यानंतर न्यायालयाने यामध्ये लक्ष या कारवाईला तुर्तास स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर नागरिकांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला होता.

संपूर्ण प्रकरण काय आहे?
पुणे महानगर पालिकेने 24 जून रोजी पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली कारवाई केली होती. दरम्यान, यावेळी पोलिस आणि स्थानिकांमधील वाद चांगलाच उपाळून आला होता. घरे पाडण्याचे काम सुरू असतानाच नागरिकांनी याला कडवा विरोध करत 5 ते 6 जणांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याच्या नावे बिल्डरांना फायदा पोहोचवण्याचा घाट सुरू आहे असा आरोप स्थानिकांनी केला होता. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 700 ते 800 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...