आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डमी कोश्यारींचे धोतर फेडले:राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जोरदार आंदोलन

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डमी भगतसिंह कोश्यारी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यात धोतर फेडले. राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपाल हटावची मागणी आंदोलकांनी केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्या भाषणात एकेरी उल्लेख केला. शिवाय त्यांची गडकरी, पवारांशी तुलना केली. यावरून वाद पेटला आहे. पुण्यात याप्रकरणी राज्यपालांचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

औरंगाबादमधून पेटला वाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षांत समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डॉक्टरेटने गौरवण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, मागच्याच वर्षी या दोघांनाही माझ्या हस्ते मानद पदवी देण्यात आली. आता पुन्हा या दोघांना माझ्या हस्ते डिलीट दिली गेली. आणखी दोन ते तीन विद्यापीठांची डिलीट यांना देणे बाकी आहे. तेथील कुलगुरूंना मी म्हणतो तुम्हाला दुसरे कोणी सापडत नाहीत का.? तर ते म्हणतात हेच आमचे आयडॉल आहेत. यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांनाच डिलीट द्यायची आहे. म्हणून माझाही नाईलाज होतो.

शिवाजी पुराने युग की बात...

कोश्यारी पुढे म्हणाले की, आमच्या शाळेत तुमचे आदर्श कोण असे विचारले जायचे. त्यावेळी कुणी सुभाषचंद्र बोस तर कोणी नेहरू, तर कोणी गांधी सांगायचे. आता नव्या युगाचे मी सांगतो आहे. तुम्हाला दुसरीकडे शोधायची गरज नाही. याच महाराष्ट्रात तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच आदर्श आहेत. असे म्हणत त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांची तुलनाही केली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कोणी तुमचे आदर्श विचारले तर तुम्ही नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे नाव घ्या. तेच नव्या युगाचे शिवाजी महाराज आहेत. शिवाजी तो अब पुराने युग की बात हो गयी है..!

राज्यभरात निषेध

कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी ठिकठिकाणी जोरदार निदर्शने केली. औरंगाबादमध्येही मराठा क्रांती मोर्चासह सर्व राजकीय पक्षांनी आंदोलन केले. त्यानंतर आज पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत डमी कोश्यारींचे धोतर फेडले. यावेळी राज्यपाल बदलाची मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...