आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शनिवारी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सडकून टीका केली आहे. 'दुनिया घुमलो, हमारे पुणे के आगे कुछ नही' असे त्या म्हणाल्या आहेत. तसेच पुणेकरांनी शोधलेल्या कोरोना लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये. असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला आहे. पुण्यात आयोजित मेळाव्यामध्ये बोलत होत्या
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, 'दुनिया घुम लो शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे. तसेच आम्हाला दिल्लीची सवय आहे. इथे मी ऐकले की, 1500 कोटी, 1600 कोटींची विकासकामे केली जात आहेत. दिल्लीमध्ये तर एक लाख कोटींच्या पुढेच सगळ्या गप्पा असतात. आम्ही त्या गप्पा ऐकतो.. आता हे कोण बोलते हे तुम्हाला माहिती आहे. आज ते पुण्यात आहेत. 'दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं' जगभर फिरलात तरीही लस शेवटी पुण्यातच सापडणार आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. अन्यथा म्हणायचे मीच शोधली. असे म्हणत सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची तयारी सुरू आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यांनी येथील कामकाजाची पाहणी केली. तसेच येथील अधिकाऱ्यांसोबत तासभर चर्चाही केली. यावरच सुप्रिया सुळे यांनी मोदींवर निशाणा साधला. कोरोनाची लस पुण्यामध्येच तयार झालेली आहे. पुणेकरांनी ती लस शोधलेली आहे. त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी क्लेम केले तर गैरसमज असू नये असे त्या म्हणाल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.