आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाव्य उमेदवारी:गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी, प्रशांत जगताप यांची लागू शकते लाॅटरी!

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागू शकते. त्यामुळे आतापासूनच राष्ट्रवादी काॅंग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या जागेसाठी एनसीपीने पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचे नाव फायनल केले आहे. विशेषतः त्यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते.

राष्ट्रवादीची दावेदारी

जगताप यांच्या बॅनरनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे लोकसभेसाठी तयारी करत कसल्याची चर्चा आहे. त्यातच आता जयंत पाटील यांनीही एक वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने दावेदारी केल्याने उमेदवारी वरुन महाविकास आघाडीमध्येच संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

जयंत पाटील म्हणाले, प्रशांत जगताप हे चांगले कार्यकर्ते नेते आहेत. पुणे शहरात संघटनेला बरोबर घेऊन ते काम करतात. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षातील अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे जर निवडणूक होणार असेल तर प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी, अशी आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

मला अनेकांचे मेसेज आले

जयंत पाटील म्हणाले, ''जगताप यांच्या संभाव्य उमेदवारीवरुन अनेक जणांनी मला तसे मेसेज करुन सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत आम्ही तशी चर्चा करू.'' हे सर्व जरी स्पष्ट असले तरीही काँग्रेस ही जागा सोडणार का? असा सवालही उपस्थित होत आहे.

एनसीपीचा सर्वे!

​​​​​​​प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे तीन नावांवर सर्व्हे केला जात आहे. त्यामध्ये शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नावांची चाचपणी केली जात आहे.