आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय नागरीकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशात आणि महाराष्ट्रात फसवा विकास केला आहे. हा फसवा विकास म्हणजेच मोदी विकास म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस 1 एप्रिल म्हणजेच "एप्रिल फुल" या दिवशी साजरा करून पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी डेक्कन येथील गुडलक चौकात प्रतिकात्मक आंदोलन करुन मोदी वाढदिवसाचा केक कापण्यात आला.
खोट्या घोषणा
दरवर्षी देशात दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार, वेदांत फॉक्सकॉन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार, पेट्रोल - डिझेल दरवाढ कमी करणार, महागाई कमी करणार, प्रत्येक नागरीकाला पंधरा लाख रुपये देणार अशा अनेक खोट्या घोषणा मोदी यांनी निवडणूकीपूर्वी केल्या. परंतु, यातील एकही घोषणा त्यांनी पुर्ण केली नाही याचा यावेळी निषेध करण्यात आला.
या आंदोलनावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक प्रदेश कार्याध्यक्ष राकेश कामठे, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर,अभिषेक बोके,मयूर गायकवाड उपस्थित होते.
माेदींच्या विकासाचा एप्रिलफुल
पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यावेळी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये सत्तेत येण्यापूर्वीपासून त्यांनी देशभरातील लोकांना विविध आश्वासने दिली. विकासाचे नवीन मॉडेल विकसित करू ,प्रत्येकाच्या बँक खात्यावर पंधरा लाख रुपये देऊ, परदेशातला काळा पैसा परत आणू, नवीन रोजगार निर्माण करू अशा प्रकारची विविध आश्वासने त्यांनी लोकांना देऊन त्यांची दिशाभूल नंतरच्या काळात केल्याचे स्पष्ट झाले आहे .
केवळ घोषणांची पूर्तता करायची, त्याची कोणतीही अंमलबजावणी करायची नाही अशाप्रकारचे गाजर पंतप्रधान मोदी सातत्याने देशवासीयांना देतात. त्यामुळे एक एप्रिल हा मोदींच्या विकासाचा वाढदिवस म्हणून आम्ही प्रतीकात्मकरित्या साजरा करत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.