आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन:इंधन दरवाढीवरून खासदार सुप्रिया सुळेंची केंद्रावर टीका, म्हणाल्या- केंद्राने जनतेची फसवणूक केली

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंधन दरवाढीविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रसचे आंदोलन सूरू असून, खासदार सुप्रिया सुळे आंदोलनस्थळी पोहोचल्या आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत. हनुमानाची आरती करुन राष्ट्रवादीने केंद्र सरकारचा निषेध केला आहे.

देशात महागाईचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने कोट्यवधी महिलांना गॅस मोफत दिले खरे, मात्र त्या महिलांने पुन्हा आता गॅस सिलिंडर आणता येत नाही, कारण गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेऊन अनेकांनी गरिबांना गॅस मिळावे म्हणून, सबसिडी सोडून दिली. मात्र महिलांना मोफत गॅस मिळाल्यानंतर आज त्यांना ते पुन्हा भरण्यास परवडत नाही, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

महागाई वाढणार हे आधीपासून बोलत होते
पुढे सुळे म्हणाल्या की, गेल्या अनेक दिवसांपासून मी संसदेत महागाईविरोधात आवाज उठवत आहे, मी त्यांना तेव्हाच सांगितले होते की, महागाईचा भडका उडणार आहे. काल रिझर्व्ह बँकेने इंटरेस्ट रेट वाढवले असून, गेल्या दीड महिन्यांपासून मी संसदेत आवाज उठवत होती, मात्र केंद्र सरकारला आणि अर्थमंत्र्यांना हे कसे काय दिसत नाही? असा सवाल यावेळी सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू

राज्यातील जनेतला महागाईपासून वाचवण्यासाठी महाविकास आघाडी हवे ते प्रयत्न करणार. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सीएनजीमध्ये 1 हजार कोटी हे महाराष्ट्र सरकारने मॅनेज करून कमी केलेले आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्य हे राज्य असतं आणि केंद्र हे केंद्र असतं

राज्य हे राज्य असतं, देशाच्या सरकारने हे सर्व निर्णय घ्यायचे असतात कारण, राज्याला माय-बाप हे केंद्र सराकार असतं, 2013-14 मध्ये महागाई जेव्हा झाली होती, त्यावेळी युपीएच्या सरकारवर टीका झाली होती, त्याहीपेक्षा आता पाचपटीने महागाईवाढ झाली आहे. आज मला कै. सुष्माताई स्वराज यांच्या भाषणाची आठवण येत आहे. तेव्हा त्यांनी विचारले होते की, "आकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है तब भान लगता है", मला देखील देशाच्या प्रंतप्रधांना हाच प्रश्न विचारायचा आहे, असे सुळे म्हणाल्या.

देवाला आपण नको अडचणीत टाकूया

राष्ट्रवादीने आंदोलनाची सुरूवात हनुमान आरतीने केली, त्यावर पत्रकाराने, "तुम्ही देवाकडे कोणते साकडे घालणार" असे प्रश्न विचारले असता, सुळे म्हणाल्या की, आपण देवाला नको अडचणीत टाकूया, देव सगळं समजतो. केंद्र सरकारला सुडबुद्धी येऊ दे, जे ते झोपयचे सोंग घेत आहेत, नको त्या विषयावर लक्ष देत आहे, त्यावर माझी त्यांनी विनंती आहे की, देशाच्या हितासाठी पक्षपात, विचारधारा सगळं बाजूला ठेवून देशाची अर्थव्यवस्थेसाठी तज्ञांकडून माहिती घ्या, अशी विनंती सुळे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...