आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवप्रताप दिन कार्यक्रम उत्साहात:देशात राजकारणाचे हिंदूकरण करण्याची गरज : कालिचरण

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाजातील मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी लढा दिला होता. त्यांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकारण्यासाठी राजकारणाचे हिंदूकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी जात, प्रांत व भाषा विसरून सर्व हिंदूंनी एकत्र येऊन आपली ‘हिंदू व्होट बँक’ तयार करावी, असे प्रतिपादन हिंदू धर्म जागरण महासभेचे कालिचरण महाराज यांनी शनिवारी येथे केले आहे.

प्रतापगड उत्सव समितीतर्फे महागणपती घाटावर आयोजित शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तेत आल्याने प्रतापगडावरील अतिक्रमण हटवण्याची उत्सव समितीची मोहीम यशस्वी झाली, असेही कालिचरण महाराज म्हणाले’. या वेळी गोरक्षक संजय शर्मा (धुळे) यांना ‘वीर जिवा महाले ‘ तर अभिवक्ता रोशन जगताप (कल्याण) यांना ‘पंताजीकाका बोकील अभिवक्ता’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सियाचीन सीमेवरील जवान हेमंत तानाजी गाढवे (बोपर्डी) याचाही सन्मान करण्यात आला. तसेच किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. या वेळी शंकराचार्य पीठाचे राष्ट्रीय सचिव वेदमूर्ती ऋषिकेश वैद्य (वसई), शामजी महाराज, वीर जिवा महाले यांच्या वंशज सुमनताई सपकाळ, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज करणसिंह मोहिते, समितीचे उपाध्यक्ष विनायक काका सणस, पंडितदादा मोडक, विराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...