आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना प्रत्येक संकटामधून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतो:जे कोणी गेले त्यांचा शोक करत बसू नका -डॉ. नीलम गोऱ्हे

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही काळात अनेक राजकीय घटना घडल्या आहेत. पण शिवसेना आजवर प्रत्येक संकटामधून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली आहे. त्यामुळे भगवद्गीतेत सांगितले आहे की, जे कोणी गेलेले आहेत. त्यांचा शोक करीत बसू नका. त्या भूमिकेतून काम चालल आहे. कधी ना कधी घर का भुला हुआ, परत येईल अस मला स्वतःला वाटत आहे. पण या संदर्भात जो काही अंतिम निर्णय घ्यायचा आहे. तो सर्वस्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, पक्षश्रेष्ठी निर्णय घेतली. अशी भूमिका त्यांनी मांडली.

दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट देऊन आरती व भेट देत आहेत. रविवारी शिवसेनेच्या विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि त्यांच्या पत्नी मीरा नार्वेकर, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ,अखिल मंडई गणपती मंडळ ते दर्शन घेतले .त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

धनुष्यबान फक्त शिवसेनेचाच

दसऱ्या मेळावा शिंदे गट का उद्धव ठाकरे करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या,शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे दसरा मेळावा होणार आहे.कस काय बाकीच्यांनी काय करावे. हा त्यांचा प्रश्न असून लोकशाहीमध्ये चांगले तोडगे निघत असतात. पण एक मैदान एक नेता ही अनेक वर्षाची परंपरा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांनी चालवली असल्याची भूमिका नीलम गोऱ्हे यांनी मांडली. दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत राज ठाकरे असणार आणि ते भाषण करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की आपल्याला एखाद्या दूरध्वनीवर आवाज येतो. त्यावेळी आसपासचा अनेक गोंधळ ऐकू येत असतो. त्या गोंधळाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे पक्षाच्या डोळ्या प्रमाणे आम्हाला फक्त शिवसेनाचा धनुष्यबाण दिसत असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

धुरळा उडवयाचा प्रयत्न

एकनाथ शिंदे गटातील आमदार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाऊन भाजपबरोबर राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे गटातील आमदार परत शिवसेनेत परत येतील का याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, जे गेलेले आहेत ते परत येतील. सध्याच्या राजकीय टीका टिप्पणी सुरू आहे.त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,सध्या जी काही टीका सुरू आहे.ती सामाजिक,राजकीय प्रश्नापेक्षा नागरिकांच्या डोळ्यात धुरळा उडवयाचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...