आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमावर्ती भागात कानडीकरण सुरु:जन्माचे दाखले कानडीत घेण्याचे बंधन! मराठीजनांचे जगणे सुसह्य करा - डाॅ. निलम गोऱ्हे

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''सीमावर्ती भागात कानडीकरण सुरू असून जन्माचे दाखलेही कानडी भाषेत घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मराठी नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालावे आणि हा भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करावा अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेतून केली.

नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशन मधील विविध मुद्द्यांबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी शिवसेना पुणे शहराध्यक्ष गजानन थरकुडे, संजय मोरे, पृथ्वीराज सुतार उपस्थित होते.

कर्नाटकला इंचभर जमीन नाही

निलम गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुरू झाला असून महाराष्ट्रातील एक इंच जमीन कर्नाटकला देणार नाही, याबाबत महत्वाचा ठराव मान्य करण्यात आला. सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षा आणि विविध शासकीय योजना लाभ मिळाला पाहिजे. याबाबत भूमिका मांडण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत लवकर निर्णय घ्यावा.

महिला सुरक्षेचा आढावा

महिला सुरक्षा बाबत राज्यात घडलेल्या विविध ठिकाणचा आढावा घेण्यात येऊन उपाययोजना करण्याचे सूचना निलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. मागील काही दिवसांपासून पुण्यात सेक्टर्शन केसेस वाढल्या आहे त्यावर कारवाई करण्याचे सूचना मांडण्यात आल्या आहे. महात्मा फुले दाम्पत्य यांनी सर्वप्रथम प्रारंभ केलेल्या पुण्यातील भिडे वाडा येथे मुलींची शाळा पुन्हा सुरू करण्यास सरकार आग्रही आहे.

विक्रमी अहवाल दाखल

या अधिवेशनमध्ये विक्रमी अहवाल दाखल झाले आहेत. वेगवेगळ्या सात ते आठ विभागांचा पाठपुरावा केल्याने सुमारे 200 पेक्षा अधिक अहवाल सादर झाले आहे.विविध विभागांचा पाठपुरावा करून 15 दिवसात अर्ज बाबत निर्णय घेण्यासाठी कक्ष अधिकारी नेमणूक करावी सुचनेस सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

अधिवेशनात कटू प्रसंग

हाफकिन इन्स्टिट्युट यांची स्वतः लस निर्माण करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु त्यांना परवानगी लवकर मिळाली नाही. या इन्स्टिट्युटचा वापर विविध पद्धतीने कशाप्रकारे करता येईल यासाठी आगामी एक ते दोन महिन्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत मुंबईत बैठक घेण्यात येणार आहे. यंदा अधिवेशन मध्ये अनेक कटू प्रसंग आले त्यामुळे कडक भूमिका घ्यावी लागली सर्व आमदारांना बोलण्यास संधी दिली. महिला उपसभापती आहे म्हणून काही केले तर चालते हे चालू न देता माझी ठाम भूमिका घेतली असे त्या यावेळी म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...