आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमावादावर केंद्राने हस्तक्षेप करावा:नीलम गोऱ्हेंची मागणी, म्हणाल्या- सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची बेजबाबदार भूमिका

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारच्या बेजबाबदार भूमिकेबाबत, केंद्राने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी पुणे येथे व्यक्त केले आहे.

वाद सीमाप्रश्नाचा

महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमा प्रश्नावर गेली अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. या दोन्ही राज्यांच्या सीमा भागात राहत असलेल्या मराठी भाषिक नागरिकांची महाराष्ट्रात सहभागी होण्याची गेली अनेक वर्षे होत नाही. बेळगाव, भालकी, बिदर सारख्या जिल्ह्यांत ही मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने होते आहे. यासाठी कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. मात्र अजूनही याबाबत काही निर्णय न झाल्याने येथील जनता याबाबत आतुरतेने वाट पाहत आहे.

कर्नाटक सरकारचा खोडसाळपणा

डॉ गोऱ्हे म्हणाल्या, कन्नड भाषिक शाळांना अनुदान देऊन कर्नाटक सरकार खोडसाळपणा करीत आहे. खरेतर महाराष्ट्र राज्य देखील इतर भाषांना प्रोत्साहन देत असते. भाषिक शाळांना अनुदान देत आहे. मात्र कन्नड भाषेचे आम्हीच खरे पुरस्कर्ते आहोत किंवा कसे याबाबत आपला टेंभा मिरविण्याची कर्नाटक सरकारची सुरू असलेली धडपड दिसत आहे. असे वागणे बरोबर नाही याबाबतची जाणीव कर्नाटक सरकारला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आणि राष्ट्रपती, पंतप्रधान महोदयांच्या माध्यमातून करून द्यायला हवी असे या निमित्ताने मला वाटते.

या कारणासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष उच्चाधिकार समितीने आपली भूमिका सौम्य न ठेवता कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले पाहिजे. आपल्या कामाचा नियमित अहवाल लोकांना सादर करावा, असे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती या नात्याने मी यावेळी आवाहन करीत आहे.

गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसचे 2 प्रचारक

महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगिता तिवारी आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि नगरसेवक अरविद शिंदे यांची गुजरात विधानसभा 2022 च्या निवडणूकीसाठी कॉंग्रेस पक्षाचे वतीने प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ही नियुक्ती जाहीर केली असून पहिला टप्पा 1 डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबर असा आहे.

संगिता तिवारी उपाध्यक्षा म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशवर कार्यरत आहेत तसेच याआधी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे वतीने काही मतदारसंघात निरीक्षक म्हणून काम केले आहे तसेच अरविंद शिंदे हे नगरसेवक आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून काम पहात आहेत.

बातम्या आणखी आहेत...