आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्डन बॉयचा मोठा सन्मान:आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे नाव नीरज चोप्रा स्टेडियम, संरक्षण मंत्री म्हणाले - आम्ही प्रत्येक खेळाडूच्या मदतीसाठी वचनबद्ध

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रगत तंत्रज्ञानाशिवाय भारत महासत्ता होऊ शकत नाही

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणाऱ्या 'गोल्डन बॉय नीरज चोप्रा'ला लष्कराने मोठा सन्मान दिला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे (ASI) नाव बदलून 'सुभेदार नीरज चोप्रा स्टेडियम' करण्याची घोषणा केली. या नामकरण सोहळ्यासाठी सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रादेखील उपस्थित होते. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नीरजचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे नीरज चोप्रा हे लष्कराच्या कमांडमध्ये तैनात आहे.

या कार्यक्रमानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, आमचे सरकार खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कटीबद्ध असून संपूर्ण देशातील खेळाडूंना हे वास्तव माहीत आहे. आपले पंतप्रधान क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहेत. एखादी संस्था असो किंवा एखाद्याला वैयक्तिक पातळीवर सराव करायचा असेल, तर सरकार त्याला सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन सरक्षण मंत्र्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमानंतर राजनाथ सिंह यांनी अनेक नव्या खेळाडूंशी चर्चा केली.

या कार्यक्रमादरम्यान संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते नीरजचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते नीरजचा सन्मान करण्यात आला.

प्रगत तंत्रज्ञानाशिवाय भारत महासत्ता होऊ शकत नाही
भारत देश प्रगत तंत्रज्ञानाशिवाय महासत्ता होऊ शकते नाही असे सरक्षणमंत्र्यांनी कार्यक्रमापूर्वी सांगितले. ते 'डीम्ड' युनिव्हर्सिटी डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी) च्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, त्यांनी DRDO सारख्या संस्थांचे कौतुक करत आम्हालाही याचे अभिमान होत असल्याचे ते म्हणाले.

पाकिस्तानी खेळाडू अर्शद सोबत हात मिळवताना सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा
पाकिस्तानी खेळाडू अर्शद सोबत हात मिळवताना सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा

पाकिस्तानी खेळाडूंचे जिंकली मने
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकणारे भारतीय खेळाडू नीरज चोप्राने पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत. भारताने अनेक वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे नीरज चोप्राचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात आले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला अंतिम फेरीपूर्वी आपला भाला मिळत नव्हता. परंतु, नंतर तो भाला पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमच्या हातात दिसला. यानंतर अर्शद नदीमवर अनेक आरोप करण्यात आले.

त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत अर्शदचा बचाव केला. ते म्हणाले की, लोकांनी कोणत्याही कारणाशिवाय प्रकरण वाढवू नये असे आवाहन नीरज लोकांने केले. इव्हेंटमध्ये भाला जमा केल्यानंतर ते इव्हेंटची मालमत्ता होते. त्यामुळे त्याला कोणी वापरू शकतो. अशावेळी अर्शदने काहीही चुकीचे केले नाही असे म्हणत अर्शदचा बचाव केला.

बातम्या आणखी आहेत...