आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच नवा व्हेरिएंट आढळून आल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. बीए.५ हा नवा व्हेरिएंट पुण्यातील एका ३१ वर्षीय महिलेमध्ये आढळला आहे. बी. जे. मेडिकल महाविद्यालयातील जीनोम सिक्वेेन्सिंगच्या ताज्या अहवालात या व्हेरिएंटची माहिती देण्यात आली आहे. मात्र, ही महिला पूर्णपणे लक्षणविरहित होती आणि घरगुती विलगीकरणात पूर्ण बरी झाली आहे, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदीप आवटे यांनी दिली.
कोरोनाच्या मूळ विषाणूमध्ये बदल घडतो म्हणजेच उत्परिवर्तन होते. याआधी आपण विषाणूमध्ये झालेल्या बदलांची डेल्टा, ओमायक्राॅन तसेच बीए-१ आणि २ ही रूपे अनुभवली आहेत. या नव्या व्हेरिएंटबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही.
जगभरात आलेल्या कोरोनाच्या अनेक लाटा या बदलत्या विषाणूमुळेच होत्या. आता पुन्हा त्यात बदल होऊन बीए-४, बीए-५ हे व्हेरिएंट समोर येत आहेत. हे प्रकार अधिक संसर्गजन्य आहेत, असे मानले जात आहे.
राज्यातील १,८८१ पैकी १२४२ रुग्ण एकट्या मुंबई शहरातील
कोरोना रुग्णांत सोमवारच्या तुलनेत पुन्हा वाढ दिसून आली. राज्यात मंगळवारी १ हजार ८८१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी १,०३६ रुग्ण आढळले होते. यातील १२४२ रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नसून ८७८ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९८.०२ टक्के इतके आहे. राज्यात सध्या ८,४३२ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.