आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:नवले पूल अपघात; फरार चालक अटकेत, नवले पुलावर पुन्हा कंटेनरचा अपघात

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील मुंबई-बंगळुरू महामार्गावर नवले ब्रिज परिसरात एका ट्रकचालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सुमारे ४८ वाहनांना धडक देत भीषण अपघात घडवला होता. त्यानंतर ट्रकचालक ट्रक महामार्गावरच सोडून पसार झाला होता. तपासादरम्यान संबंधित फरार झालेला ट्रकचालक चाकण परिसरात पोलिसांना मिळून आल्याची माहिती सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संख्ये यांनी दिली आहे. मनिराम छोटेलाल यादव (रा. मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. इंधन वाचवण्यासाठी त्याने उतारावर ट्रक बंद केला होता, त्यामुळे अपघात घडल्याचे तपासात समोर आले.

नवले पुलावर पुन्हा कंटेनरचा अपघात : दोन दिवसांपूर्वी झालेल्या मोठा अपघात ताजा असताना नवले पुलावर मंगळवारी पुन्हा एकदा अपघात झाला. भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मधील असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला आहे. या धडकेत २ गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू; सुप्रिया सुळेंची भेट मंगळवारी सकाळी स्वामीनारायण मंदिर ते नवले पूलदरम्यानचे सर्व्हिस रस्ता आणि महामार्ग लगतचे अनधिकृत बांधकामे काढून रस्ता रुंदीकरणाचे काम नॅशनल हायवे अथॉरिटीने हाती घेतली. दुसरीकडे, नवले पूलाजवळ सातत्याने होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे व रस्ता सुरक्षेच्या सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक त्वरीत बोलवावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...