आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालपरीचा अमृत महोत्सव:एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची हमी राज्य सरकारने घेतली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी कर्मचाऱ्यांच्या पुढच्या काही वर्षांच्या वेतनाची हमी राज्य सरकारने घेतली आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आज एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे बोलत होते.

वेतनाचे काय करणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आयपीएलमध्ये सुद्धा आपण मोठी स्वप्ने बघण्याच्या जाहिराती पाहिल्या. आज एसटीमुळे कसा उपयोग झाला हे सांगणारे अनेक जण भेटतील. एसटी कर्मचाऱ्यांकडे आम्ही परिवाराचे सदस्य म्हणून पाहतो. अनेकवेळा एसटी आपण तोट्यात गेल्याची पाहतो. कारण सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी ही सेवा चालवली जात आहे. हे करताना तोटा सहन करावा लागतो. आपले परिवहन मंत्री येतात आणि विचारतात की, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे काय करायचे. मात्र, आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाकडून दिलेच. शिवाय पुढच्या काही वर्षांची वेतनाची हमी घेतल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना काळात योगदान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, काळाप्रमाणे एसटी बदलली आहे. सध्या योग्य वेळेत प्रवाशांना त्यांच्या इच्छित ठिकाणी घेऊन जाण्याचे काम एसटी करत आहे. एसटी सेवेने 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल एका शाळकरी मुलीने एसटीला शुभेच्छा दिल्या आहेत. म्हणजेच अनेकजणांचे भविष्य घडवण्यात एसटीचा वाटा आहे. कोरोनाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी पराक्रम केला. समोर मृत्यू दिसत असताना काम करणे सोपे नव्हते. मात्र, तरीही गाव तिथे एसटी व शहरातही एसटी वाहतुकीची जबाबदारी आपण पार पडली. आपण वारकऱ्यांचे आशीर्वाद घेता आहात. मुलांचे भविष्य जपत आहात, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे केले.

पैशाचे सोंग करता येत नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व काही करता येते, पण पैशाचे सोंग घेता येत नाही. कोणाला बरं वाटावं म्हणून आम्ही न झेपणाऱ्या गोष्टी केल्या नाहीत. जे जे करता येणे शक्य आहे, ते केले. यापुढेदेखील कुठेही काचकूच करणार नाही. आपण राज्याचे वैभव आहात. बरेच ठिकाणे रस्ते चांगले होत आहेत. पु. ल. देशपांडे यांची म्हैस ही कथा अनेकांनी वाचली असेल. आता तर रस्ते सुधारत आहेत. पर्यावरणपूरक वाहने मुंबईत सुरू झाली आहेत. सर्वात जास्त इलेक्ट्रिक बस असणारे मुंबई हे पहिले शहर ठरणार आहे. तंत्रज्ञान नवीन आहे. तरीही एसटीत आपण हा प्रयोग करत आहोत. हळूहळू एसटीची सेवा प्रदूषण विरहित करण्यावर भर देणार आहोत. तुम्ही कधीही हा विचार मनात आणू नका, तुम्ही आणि सरकार वेगळे आहोत. तुम्ही महाराष्ट्राचे अविभाज्य घटक आहात, असे आश्वासन त्यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...