आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुण्यात छापा टाकून इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (आयएसकेपी) प्रकरणातील एका संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली. एनआयएच्या पथकाने पुण्यासह मध्य प्रदेशातील सिवोनी जिल्ह्यातही छापा टाकून संशयितांची चौकशी केली.
दिल्लीतून काश्मिरी दाम्पत्य जहाँजेब वाणी आणि त्याची पत्नी बशीर बेग यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) अटक केली होती. वाणी दांपत्य इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत दहशतवादी गटाशी संबंधित असल्याची माहिती तपासात मिळाली होती. या प्रकरणात तिहार कारागृहातील आरोपी अब्दुल बासित संशयित असल्याचे उघडकीस आल्यानंतर एनआयएने मध्य प्रदेशातील सिवोनी आणि पुण्यात छापा टाकला. पुण्यातील तलहा खान आणि मध्य प्रदेशातील सिवोनी गावातील अक्रम खान याच्या घरी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. मध्य प्रदेशात तरुणांना एकत्र आणून त्यांच्याकडून दहशतवादी कारवाया करून घेतल्या जाणार होत्या. अफगाणीस्तानसह देशात सक्रिय विविध दहशतवादी गटांचे काम सोशल मीडियावर प्रसारित करून तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्याचे काम केले जात असल्याची माहिती धिकाऱ्यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.