आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा कोरेगाव हिंसा प्रकरण:चार्जशीटमध्ये NIA चा दावा - एल्गार परिषद आणि माओवाद्यांत संबंध, अटकेतील 16 आरोपी देशाविरुद्ध युद्ध छेडण्याची करत होते तयारी, JNU मध्ये चालू होते रिक्रूटमेंट

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेएनयू आणि टीआयएसएसच्या विद्यार्थ्यांची भरती करण्यात आली

भीमा कोरोगाव हिंसाचार प्रकरणी NIA ने 16 आरोपी आणि सहा फरार आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये एनआयएने म्हटले आहे की, एल्गार परिषद आणि माओवादी संघटना यांच्यात संबंध आहेत. आरोपींनी सरकार आणि तेथील नागरिकांच्या विरोधात कट रचून भारताची सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा धोक्यात आणण्याचे काम केल आहे. यांना देशाविरुद्ध युद्ध पुकारून आपले सरकार चालवायचे होते.

आरोपपत्रात म्हटले आहे की दहशतवाद विरोधी बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत आठ आणि IPC अंतर्गत आठ आरोप आहेत. एनआयएने म्हटले आहे की, 31 डिसेंबर 2017 रोजी आयोजित एल्गार परिषदेचा उद्देश दलित आणि इतर जातींच्या सांप्रदायिक भावना भडकावून महाराष्ट्र, भीमा कोरेगाव आणि पुणे जिल्ह्यांमध्ये जातीच्या नावावर हिंसा, अस्थिरता आणि अराजक निर्माण करणे हा होता.

जेएनयू आणि टीआयएसएसच्या विद्यार्थ्यांची भरती करण्यात आली
विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना, एनआयएने उघड केले की, आरोपींनी दहशतवादाचा कट रचण्यासाठी देशातील दोन प्रतिष्ठित संस्था, जेएनयू आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (मुंबई) मधील विद्यार्थ्यांची भरती केली होती. देशाविरुद्ध एक षडयंत्र तयार केले जात होते, ज्यात या विद्यार्थ्यांचा वापर केला जाणार होता.

NIA च्या मते, या प्रकरणात अटक केलेले आरोपी मणिपूरमधील दहशतवादी संघटनांना M4 शस्त्रे आणि 4 लाख राऊंड (काडतुसे) पुरवण्यासाठी 8 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात गुंतले होते. आरोपींना या शस्त्रांद्वारे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला लक्ष्य करायचे होते.

पोलिसांच्या आरोपपत्रात हा आरोप होता
याआधी पुणे पोलिसांनी आयपीसीच्या कलम 121 आणि 121-ए अंतर्गत आरोपांचा उल्लेख करत या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केले होते. पोलिसांच्या आरोपपत्रात म्हटले आहे की, सर्व 16 अटक, 'जे प्रतिबंधित दहशतवादी संघटना/सीपीआय (माओवादी) चे सक्रिय सदस्य आहेत, त्यांनी सरकार (केंद्र आणि राज्य) च्याविरोधात युद्ध छेडण्याचा कट रचला आहे. यासाठी सर्वांनी 8 कोटी रुपये जमा केले आहेत आणि नेपाळ आणि मणिपूरमधून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आयात करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

एल्गार परिषदेला माओवाद्यांनी निधी दिला होता
पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, 31 डिसेंबर 2017 रोजी शहरात आयोजित एल्गार परिषद कार्यक्रमाला मोठ्या षडयंत्राचा भाग म्हणून सीपीआय (माओवादी) ने निधी दिला होता. दुसऱ्या दिवशी, 1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव लढाईच्या 200 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले होते. भीमा-कोरेगाव संघर्षानंतर जानेवारीमध्ये राज्यव्यापी बंद दरम्यान पोलिसांनी 162 लोकांवर 58 गुन्हे दाखल केले होते.

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यात झाला होता हिंसाचार
1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव युद्धाच्या 200 व्या वर्धापन दिन सोहळ्यादरम्यान हिंसाचार झाला होता. या घटनेत एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतरच्या तपासात असे उघड झाले की, या हिंसाचाराचे नियोजन एक दिवस आधी पुण्याच्या शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेदरम्यान झाले होते. यानंतर हे प्रकरण पुणे पोलिसांमार्फत एनआयएपर्यंत पोहोचले आणि आता केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने या प्रकरणात आपले आरोपपत्र दाखल केले आहे.

बातम्या आणखी आहेत...